Virat Leave RCB : विराट कोहली आरसीबी सोडून या संघांसोबत जाणार ! माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

| Updated on: May 22, 2023 | 7:48 PM

आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आतापर्यंत झालेल्या 16 सिझनमध्ये एकही जेतेपद आरसीबीला पटकावता आलं नाही. त्यामुळे आता विराट कोहली आरसीबीला सोडचिठ्ठी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Virat Leave RCB : विराट कोहली आरसीबी सोडून या संघांसोबत जाणार ! माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ
Virat Leave RCB : विराट कोहली आरसीबी सोडून या संघांसोबत जाणार! माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि विराट कोहली यांचं एक वेगळंच नात आहे. विराट कोहली 2008 पासून आरसीबी संघासोबत आहे. आतापर्यंत झालेल्या 16 पर्वात विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत आहे. लीगमध्ये एकाच टीमकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा मान विराट कोहलीला मिळाला आहे.विराट कोहलीचा फॉर्म पाहता इतर फ्रेंचाईसी आपल्या संघात सहभागी करण्यासाठी तयार आहेत. मात्र माजी कर्णधार विराट कोहलीने त्याला दाद दिली नाही. पण असं असलं तरी विराट कोहलीला संघासाठी जेतेपद मिळवता आलं नाही. यंदाही विराट कोहलीचं जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. गुजरात टायटन्सकडून पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडच्या माजी खेळाडूने विराट कोहलीला आरसीबी सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्याने ट्वीट करून याबाबत ही माहिती दिली आहे.

“आता विराट कोहलीने कॅपिटल सिटीसाठी खेळण्याची वेळ आली आहे.” असं ट्वीट करत हॅशटॅग आयपीएल केलं आहे. केविन पीटरसनने विराट कोहलीला आरसीबी सोडून दिल्लीसोबत खेळण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे केविन पीटरसन हा विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे.

 

विराट कोहली दिल्लीतला असून दिल्लीकडून रणजी आणि इतर सामने खेळला आहे. 2008 मध्ये, जेव्हा आयपीएलचा पहिला लिलाव झाला, तेव्हा दिल्ली कोहलीची निवड करेल हे जवळजवळ निश्चित होते. गेल्या वर्षी एका आरसीबी पॉडकास्ट शोमध्ये कोहलीने सांगितलं होतं की, दिल्ली त्याला निवडण्यात उत्सुक होती. परंतु डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानची निवड करण्यात आली.

सांगवान गोलंदाजीत चांगल्या फॉर्मात होता आणि फलंदाजांना अडचणीत आणत होता. त्यात दिल्लीला गोलंदाजाची आवश्यकता होती आणि त्यांनी त्याची आधी निवड केली. सांगवानचं करिअर काही पुढे गेलं नाही. पण विराट कोहली क्रिकेटमध्ये स्टार बनला. विराट कोहलीने टीम इंडियाचं नेतृत्वही केलं. कित्येक वर्षे आरसीबीसाठी कर्णधारपद भूषवलं. मात्र 2021 मध्ये कर्णधारपदावरून पायउतार झाला.

विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला आहे. त्याने 237 सामन्यांमध्ये 7263 धावा केल्या. यात 7 शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 14 सामन्यात 639 धावा केल्या. यात दोन शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.