मुंबई : आशिया कप 2023 सुरू व्हायला चार दिवस बाकी असून सर्व संघांनी आपल्या संघांची घोषणा केलीये. दुखापतीतून सावरत टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंनी कमबॅक केलं आहे मात्र मैदानात हे खेळाडु कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आशिया कप सुरू होण्याआधी यो-यो टेस्ट घेण्यात आली असून यामध्ये एका युवा खेळाडूने किंग कोहलीला पछाडल्याची माहिती समोर आली आहे. विराट कोहली याने यो-यो टेस्टमध्ये मिळवलेला स्कोर पोस्ट करत सांगितला होता. परंतु संघातील युवा असलेल्या खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त स्कोर केलाय.
टीम इंडियामधील फिट खेळाडूंमध्ये विराट कोहलीसुद्धा असून कोहली फिटनेसवर खूप मेहनत घेतो. वयाच्या 34 व्या वर्षी विराटनो यो-यो टेस्ट सहज पार केलीये. विराटने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये त्याने टेस्टमध्ये 17.2 स्कोर केला होता. हा स्कोर तुम्ही यो-यो टेस्टमध्ये पात्र होण्यासाठी पर्फेक्ट आहे. कोहली अनेकदा त्याचे जिममधील व्यायाम करतानाचे व्हिडीओ पोस्ट करतो.
विराट कोहलीला नव्या दमाच्या खेळाडूने मागे टाकलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसुन शुबमन गिल आहे. शुबमन गिल 18.7 स्कोर करत टॉपर राहिला, त्याने विराटलाच नाहीतर टीममधील सर्वांना मागे टाकत सर्वाधिक 18.7 स्कोर केला.
यो-यो टेस्ट पास होण्यासाठी कमीत कमी 16.5 स्कोर करावा लागतो. टीम इंडियाचे सर्व खेळाडू ही टेस्ट पास करण्यास यशस्वी ठरले. याआधी टीम इंडियाच्या काही खेळाडूंना हा टास्क पूर्ण करता आला नाही. मोहम्मद शमी, संजू सॅमसन, युवराज सिंग, अंबाती रायडू आणि सुरेश रैना हे खेळाडूसुद्धा यो-यो टेस्टमध्ये फेल गेले होते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.