RR vs CSK 2023 : Yashasvi jaiswal ने असं काय केलं? ज्यामुळे पळाल्या चेन्नईच्या चीयरलीडर्स, VIDEO

| Updated on: Apr 28, 2023 | 1:06 PM

RR vs CSK IPL 2023 : Yashasvi jaiswal ने पळवलं चेन्नईच्या चीयरलीडर्सना, Watch VIDEO. राजस्थान रॉयल्सने काल चेन्नई सुपर किंग्सवर मात केली. यशस्वी जैस्वाल राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला.

RR vs CSK 2023 : Yashasvi jaiswal ने असं काय केलं? ज्यामुळे पळाल्या चेन्नईच्या चीयरलीडर्स, VIDEO
yashasvi jaiswal
Image Credit source: instagram
Follow us on

RR vs CSK IPL 2023 : IPL 2023 च्या 37 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 32 धावांनी पराभूत केलं. राजस्थानच्या विजयात यशस्वी जैस्वालने महत्वाची भूमिका बजावली. त्याने 43 चेंडूत 77 धावांची तुफान खेळी केली. जैस्वालच्या या इनिंगच्या बळावर राजस्थान टीमने 202 ही विशाल धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात चेन्नईच्या टीमने फक्त 170 धावा केल्या. या सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वालने असं काही केलं की, ज्यामुळे चीयरलीडर्सची चांगलीच पळापळ झाली.

चीयर लीडर्सची एकच पळापळ

आश्चर्य वाटून घेऊ नका, यशस्वी जैस्वालने खेळलेला एक शॉट हे चीयरलीडर्सच्या पळापळीमागे कारण आहे. यशस्वीने 7 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर एक जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला. या शॉटवर त्याने सिक्स वसूल केला. चेंडू थेट बाऊंड्री लाइनवर चीयरलीडर्सच्या दिशेने गेला. चेंडू आपल्या दिशेने येतोय, हे दिसताच चीयर लीडर्सची एकच पळापळ झाली.

यशस्वी जैस्वालची कमाल

यशस्वी जैस्वालच्या या शॉटने भले चीयरलीडर्स घाबरल्या असतील, पण क्रिकेट फॅन्सना हा फटका खूपच आवडला. क्रिकेटमधल्या पारंपारिक फटक्यांशिवाय आपण असे वेगळे शॉट्स सुद्धा मारु शकतो, हे यशस्वी जैस्वालने दाखवून दिलं.


टीम इंडियाच भविष्य

यशस्वी जैस्वाल सध्या ज्या पद्धतीची बॅटिंग करतोय, ते पाहून लवकरच तो टीम इंडियातून खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. जैस्वालने तिन्ही फॉर्मेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलय. जैस्वालने लिस्ट ए मध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्यात. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 80 च्या पुढे आहे. आयपीएलमध्ये सुद्धा त्याची क्षमता दिसून येतेय. ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर टॉम मुडीने सुद्धा टि्वट करुन हीच गोष्ट सांगितली. यशस्वीच्या रुपात टीम इंडियाला एक मोठा खेळाडू मिळालाय, असं मुडीने टि्वटमध्ये म्हटलय.

यशस्वीची टेक्निक कमालीची आहे. हा खेळाडू वेगवान गोलंदाजांबरोबर स्पिर्न्स विरुद्ध सुद्धा सहजतेने खेळतो. यशस्वीची मानसिकता सकारात्मक आणि आक्रमक आहे. त्यामुळे तो एक वेगळ्या लेव्हलचा खेळाडू आहे.