पश्चिम बंगाल | आयपीएल 16 व्या मोसमातील 53 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डमध्ये करण्यात आलं होतं. या थरारक झालेल्या सामन्यात केकेआरने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. रिंकू सिंह याने शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज असताना चौकार ठोकला आणि केकेआरला विजयी केलं. पंजाबने केकेआरला 180 धाावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने ते आव्हान 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कोलकाताचा हा या मोसमातील 5 वा विजय ठरला.
कोलकाता आणि पंजाबचा हा या मोसमातील दुसरा सामना होता. या आधी हे दोन्ही संघ 1 एप्रिलला भिडले होते. तेव्हा केकेआरचा डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी विजय झाला होता. त्यामुळे पंजाब या मॅचमध्ये विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र केकेआरने दुसऱ्यांदा पंजाबवर मात केली.
रिंकू सिंह याने पुन्हा एकदा केकेआरला विजय मिळवून दिला आहे. केकेआरला विजयासाठी1 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती. तेव्हा रिंकूने अर्शदीप सिंह याच्या बॉलिंगवर चौकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिला.
केकेआरला 1 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. रिंकू सिंह स्ट्राईकवर आहे.
केकेआरला 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज, सामना रंगतदार स्थितीत.
केकेआरला 3 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. रसेल आणि रिंकू सिंह मैदानात आहेत.
आंद्रे रसेल याने 19 व्या ओव्हरमध्ये सॅम करन याच्या बॉलिंगवर 3 सिक्स ठोकले. यामुळे आता केकेआरला विजयासाठी 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे.
कोलकाताकडून रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल ही जोडी पंजाब किंग्स झंझावाती खेळी करत आहे. ही जोडी हा सामना कुठपर्यंत घेऊन जाते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
केकेआरला चौथा आणि मोठा झटका लागला आहे. कॅप्टन नितीश राणा 38 बॉलमध्ये 51 रन्स करुन आऊट झाला.
केकेआरने तिसरी विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यर याने 13 बॉलमध्ये 11 धावा केल्या.
केकेआरला दुसरा झटका लागला आहे. जेसन रॉय 24 बॉलमध्ये 38 धावा करुन माघारी परतला आहे. हरप्रीत ब्राररने शाहरुख खान याच्या हाती रॉयला कॅच आऊट केलं.
केकेआरने पहिल्या 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. जेसन रॉय आणि कॅप्टन नितीश राणा ही जोडी मैदानात खेळत आहे.
केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून जेसन रॉय आणि रहमनुल्लाह गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. पंजाबकडून कॅप्टन शिखर धवन याने 47 बॉलमध्ये सर्वाधिक 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीन 57 धावांची कॅपन्टन्सी खेळी केली. प्रभासिमरन सिंह याने 12 रन्स जोडल्या. भानुका राजपक्षा झिरोवर आऊट झाला. लियाम लिविंगस्टोन याला वरुण चक्रवर्थी याने 15 धावांवर आऊट केला. जितेश शर्मा याने 21 रन्स जोडल्या.
सॅम करनला फक्त 4 धावाच करता आल्या. ऋषी धवन 19 रन्स करुन तलवार म्यान केली. तर शाहरुख खान आणि हरप्रीत ब्ररार या दोघांनी निर्णायक क्षणी टॉप गिअर टाकत जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 40 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. शाहरुख खान याने 8 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नॉट आऊट 21 धावांची निर्णायक खेळी केली. तर हरप्रीत ब्रार याने 9 बॉलमध्ये 1 सिक्स 2 फोरसह नाबाद 17 धावा केल्या.
केकेआरकडून वरुण चक्रवर्थी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षीत राणा याने 2 फलंदाजांना चालता केला. तर सुयश शर्मा आणि कॅप्टन नितीश राणा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्सने 20 व्या ओव्हरमध्ये 21 धावा केल्या. हरप्रीत ब्रार आणि शाहरुख खान या दोघांनी या 21 रन्स केल्या. विशेष बाब म्हणजे या दोघांनी आठव्या विकेट्ससाठी 40 धावांची नाबाद भागीदारी केली. केकेआर गोलंदाजांनी पंजाबला 18 ओव्हरपर्यंत बांधून ठेवलं होतं. मात्र या 2 ओव्हर निर्णायक ठरल्या. आता या 2 ओव्हरमध्ये आलेल्या धावा किती निर्णायक ठरणार याकडे लक्ष असेल.
पंजाबला सातवा धक्का लागला आहे. सॅम करन 4 रन्स करुन माघारी परतला.
पंजाबला सहावा झटका लागला आहे. ऋषी धवन 19 रन्स करुन आऊट झाला आहे.
पंजाब किंगसला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन शिखर धवन 47 बॉलमध्ये 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
पंजाब किंग्स कॅप्टन शिखर धवन याने अर्धशतक ठोकलं आहे. शिखर नाबाद खेळत आहे. त्याच्याकडून पंजाब समर्थकांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
वरुण चक्रवर्थी याने जितेश शर्मा आणि शिखर धवन ही जोडी फोडली आहे. चक्रवर्थी याने जितेश शर्मा याला आऊट करत पंजाब किंग्सला चौथा झटका दिला. विकेटकीपर गुरुबाजने स्टंपमागे अप्रतिम कॅच घेतला.
जितेश शर्मा आणि शिखर धवन या जोडीने पंजाबसाठी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. पंजाबची 3 बाद 53 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर धवन आणि शर्मा या दोघांनी चांगली फटकेबाजी करत पंजाबचा डाव सावरला.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याने लियाम लिविंगस्टोन याला आपल्या जाळ्यात फसवत एलबीडबल्यू आऊट केलं आहे. लियामने 15 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
पंजाबने दुसरी विकेट गमावली आहे. भानुका राजपक्षा भोपळा न फोडताच माघारी परतला आहे.
पंजाब किंग्सने पहिली विकेट गमावली आहे. प्रभासिमरन सिंह 8 बॉलमध्ये 12 धावा करुन आऊट झाला आहे.
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन शिखर धवन आणि प्रभासिमरन सिंह ही सलामी जोडी मैदानात आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वैभव अरोरा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्स प्लेंइग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभासिमरन सिंग, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, रिशी धवन राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
पंजाब किंग्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन शिखर धवन याने पहिले बॅटिंग करणार आहे. त्यामुळे पंजाब केकेआरला घरच्या मैदानात किती धावांचं आव्हान देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता विरुद्ध पंजाब हे दोन्ही संघांमध्ये आयपीएल इतिहासात एकूण 31 वेळा लढत झाली आहे. यामध्ये कोलकाताचा एकतर्फी वचर्स्व आहे. केकेआरने पंजाबवर 20 वेळा मात केली आहे. तर पंजाबला 11 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांसाठी हा करो या मरो असा सामना आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी म्हणजेच प्लेऑफ क्वालिफाय होण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी टक्क पाहायला मिळणार आहे.