तामिळनाडू | चेन्नई सुपर किंग्स टीमने आयपीएल 2023 च्या क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स टीमवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी गुजरातला 20 ओव्हरमध्ये 157 धावांवर ऑलआऊट केलं. चेन्नईच्या सर्वच खेळाडूंनी या विजयात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. चेन्नईने या विजयासह फायनलमध्ये धडक मारली आहे. तर गुजरातचा पराभव झाला असला, तरी त्यांना फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
गुजरातकडून बऱ्याच फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र एकालाही विजी खेळी साकारण्यात यश आलं नाही. शुबमन गिलचा अपवाद वगळता एकानेही चेन्नईच्या गोलंदाजांचा नीट सामना केला नाही. गुजरातकडून शुबमन याने सर्वाधिक 42 धावा केल्या.
ऋद्धीमान साहा याने 12 रन्सचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या मोक्याच्या सामन्यात अपयशी ठरला. पंड्याने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. दासून शनाकाने 17 धावा जोडल्या. डेव्हिड मिलरने निराशा केली. मिलर 4 रन्सवर आऊट झाला. विजय शंकर याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र शंकर 14 धावांवर तंबूत परतला.
राहुल तेवतिया ही फुसका बॉम्ब निघाला. तेवतिया 3 धावांवर आऊट झाला. दर्शन नळकांडे राशिदला स्ट्राईक देण्याच्या नादात नॉन स्ट्राईक एंडवर रनआऊट झाला. अखेरीस राशिद खान याने फटकेबाजी केल्याने गुजरातच्या आशा कायम होत्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. राशिद खानने 30 धावा केल्या. मोहम्मद शमी याने 5 धावा केल्या. तर नूर अहमद हा 7 धावांवर नाबाद राहिला.
चेन्नईकडून दीपक चाहर, महेश तीक्षणा, रविंद्र जडेजा आणि मथिश पथिराणा या चौघांनी चेन्नईच्या 2-2 बॅट्समनचा काटा काढला. तर तुषार देशपांडे याने एकच पण राशिदची निर्णायक विकेट घेतली.
त्याआधी गुजरात टायटन्सने टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. डेव्हॉन कॉनवे याने 40 धावा केल्या. रविंद्र जडेजा 22 धावा करुन माघारी परतला. तर अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी प्रत्येकी 17-17 धावा केल्या. शिवम दुबे आणि धोनी या जोडीने प्रत्येकी 1-1 धावा केली. या दोघांनीही चेन्नईची निराशा केली. तर मोईन अलीने अखेरीस नाबाद 9 धावा केल्या.
गुजरातकडून मोहम्मद शमी आणि याने मोहित शर्मा या दोघांनी चेन्नईच्या 2-2 फलंदाजांना आऊट केलं. तर दर्शन नळकांडे, राशिद खान आणि नूर अहमद या तिकडीने 1-1 विकेट घेतली.
दरम्यान या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात. आरसीबीचं आयपीएल 2023 मधील आव्हान हे साखळी फेरीतच संपलं. मात्र त्यानंतरही आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस याच्याकडेच ऑरेन्ज कॅप कायम आहे. गुजरातच्या शुबमन गिल याच्याकडे फाफला मागे टाकण्याची संधी होती. शुबमन याला फक्त 51 धावांची गरज होती. मात्र शुबमन फाफच्या 9 धावांनी मागे राहिला. शुबमनने आपलं दुसरं स्थान कायम राखलंय. त्यामुळे आता शुबमनला क्वालिफायर 2 मध्ये ऑरेन्ज कॅपसाठी 9 धावा कराव्या लागतील.
तिसऱ्या स्थानी विराट आणि चौथ्या क्रमांकावर यशस्वी जयस्वाल आहे. तर पाचव्या क्रमांकावर डेव्हॉन कॉनवे आहे. कॉनवेने गुजरात विरुद्ध 40 धावा केल्या. आता कॉनवेला ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत आपलं स्थान सुधारण्याची संधी आहे. कॉनव्हेने फायनलमध्ये किमान 15 धावा करताच तो यशस्वी आणि विराटला मागे टाकत थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल. तर मोठी खेळी साकारल्यास त्याला ऑरेन्ज कॅप पटकावण्याची ही संधी आहे.
तर मोहम्मद शमी याने 2 विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्याकडेच ठेवली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचाच राशिद खान हा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. राशिदनेही चेन्नई विरुद्ध 1 विकेट घेतली. तसेच तुषार देशपांडे याने 1 विकेट घेतल्याने तो थेट चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. त्यामुळे पीयूष चावला याची चौथ्यावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली
पर्पल कॅप
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये साखळी फेरीच्या शेवटपर्यंत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी होती. त्यामुळे गुजरातला फायनलमध्ये पोहचण्याची दुसरी संधी मिळणार आहे. गुजरात क्वालिफायर 2 मध्ये आता खेळणार आहे. गुजरातचा हा सामना एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीम विरुद्ध होणार आहे. एलिमिनेटर सामना हा बुधवारी 24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश थेक्षाना.