मुंबई : आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. एकीकडे मुंबईला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे गेल्या सामन्यात आरसीबीचा दिल्लीकडून पराभव झाला. अशा स्थितीत या सामन्यात दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे. या रोमांचक सामन्यापूर्वी, आज आम्ही तुम्हाला ड्रीम11 टीम सांगणार आहोत जी तुम्हाला फायदा करून देऊ शकते.
गेल्या सामन्यात या मैदानावर मोठ्या धावा झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आजच्या सामन्यातही मुंबईच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारली जाईल, अशी अपेक्षा आहे. या सामन्यात दवही मोठे परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय येथे फायदेशीर ठरू शकतो.
IPL 2023 चा 54 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात संध्याकाळी 7:30 पासून खेळवला जाईल. त्याचबरोबर नाणेफेकीची वेळ 30 मिनिटे आधी म्हणजेच 7 वाजता असेल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘Jio Cinema’ अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे तुम्ही 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता.
यष्टिरक्षक – ईशान किशन
फलंदाज – विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), फाफ डुप्लेसी
अष्टपैलू – कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, वानिंदू हसरंगा
गोलंदाज– पियुष चावला, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (C), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल, अर्शद खान
आरसीबी – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड