मुंबई : आयपीएल 2023 क्वॉलिफायर स्पर्धेत पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. अवघ्या काही तासांमध्ये हा सामना सुरु होणार आहे. महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाचा कस या सामन्यात लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये पांड्या धोनीबाबत सांगताना दिसत आहे. त्याच्या बोलण्यावरून महेंद्रसिंह धोनीसोबत त्याचं नातं कसं आहे, हे अधोरेखित होतं. हार्दिकनं धोनीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यामुळे धोनी आणि पांड्याचे चाहते एकदम खूश झाले आहेत.
हार्दिक पांड्याचा हा व्हिडी गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर सामन्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या धोनीबाबत दिलखुलासपणे बोलताना दिसत आहे. हार्दिक पांड्याने सांगितलं की, “काही लोकांना वाटतं की धोनी खूपच गंभीर व्यक्तिमत्त्व आहे. पण असं अजिबात नाही. मी त्याच्यासोबत सहज थट्टा मस्करी करतो. मी त्याला एमएन धोनी समजून भेटत नाही. तो माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड असून मोठ्या भावासारखा आहे.”
“महेंद्रसिंह धोनीकडून मी खूप काही शिकलो आहे. जे काही मिळवलं ते त्याला फॉलो करूनच मिळवलं आहे. शिकण्यासाठी मी त्याच्याशी जास्त काही बोललो नाही. क्रिकेटमधील त्याचं ज्ञान जबरदस्त आहे.” असंही हार्दिक पांड्याने पुढे सांगितलं.
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, वृद्धिमान साहा (विकेटकीपर)
चेन्नई सुपर किंग्स : एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना, रवींद्र जडेजा
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.