मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा टॉप फलंदाज विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. अर्धशतकांची एकापाठोपाठ एक रांग लावली आहे. विराटने 10 सामन्यात 419 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात विराट आणि गंभीरचं भांडणही चर्चेत राहीलं. पण असं असताना विराट कोहलीचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. त्याच्या चांगुलपणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हारयल होत आहे. लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांना भेटल्यानंतर त्याने खाली वाकुन नमस्कार केला. त्याची ही कृती पाहून आयएएस अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विराट कोहली आपल्या गुरुंना खाली वाकुन पाया पडत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आयएएस अधिकारी शरण यांनी लिहिलं आहे की, “तुम्ही कितीही मोठे व्हा पण आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणं आवश्यक आहे. ”
कितने भी बड़े हो जाओ; बड़ों का सम्मान मत भूलो. pic.twitter.com/T9njWCcdhW
— Awanish Sharan ?? (@AwanishSharan) May 7, 2023
विराटने दिल्ली विरुद्ध आरसीबी या सामन्याआधी विराट कोहली सरावासाठी मैदानात उतरला. यावेळेस विराट कोहलीचे लहाणपणीचे कोच राजकुमार शर्मा हे मैदानात हजर होते. राजकुमार शर्मा यांना पाहताच विराट त्यांच्या दिशेने चालत गेला आणि सर्वात आधी त्यांच्या पाया पडला. विराटने पाया पडल्यानंतर राजकुमार शर्मा यांना घट्ट मीठी मारली. यानंतर दोघांनी चर्चा केली. विराटचं हे रुप पाहून चाहतेही शॉक झाले.
या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.एका युजर्सने लिहिलं आहे की, कोहली मनाने विराट आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, कोहली सारखा महान क्रिकेटपटू नाही.
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.