IPL 2023 : तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये मिळणार अशी संधी, जाणून घ्या जर तरच गणित

| Updated on: May 09, 2023 | 4:52 PM

आयपीएल 2023 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. साखळी फेरीतील मोजके सामने उरले असून अजूनही प्लेऑफचं चित्र स्पष्ट नाही. दिल्ली आणि हैदराबाद हे दोन्ही संघ तळाशी आहेत. पण या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यची अजूनही संधी आहे.

IPL 2023 : तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये मिळणार अशी संधी, जाणून घ्या जर तरच गणित
IPL 2023 : दहाव्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये असं स्थान मिळणार, समजून घ्या कसं ते
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत एकूण 10 संघ असून प्रत्येक संघाला एकूण 14 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी काही संघांनी 11 सामने खेळले आहेत. तर काही संघांनी 10 सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने एकूण 10 सामने खेळले असून 4 विजयांसह 8 गुणांची कमाई केली आहे. मात्र गुणतालिकेत सर्वात शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. मात्र अजूनही दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. यासाठी दिल्लीला उर्वरित चार पैकी चार सामने जिंकणं गरजेच आहे. हे सामने दिल्लीला मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. जेणेकरून गुणांसह नेट रनरेटवर चांगला फरक दिसून येईल. त्याचबरोबर इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सला शेवटचे चार सामने चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्ससोबत खेळायचे आहेत. म्हणजेच एका संघासोबत दोनदा भिडावं लागणार आहे. उरलेल्या चार पैकी पहिला सामना 10 मे 2023 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा आहे. त्यानंतर दुसरा सामना 13 मे 2023 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स, तिसरा सामना 17 मे 2023 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स आणि चौथा सामना 20 मे 2023 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा आहे.

कसं असेल गणित ते वाचा

  • दिल्ली कॅपिटल्सला उर्वरीत चारही सामने कसेही करून जिंकावेच लागतील. एक सामना जरी हरला तर प्लेऑफचं स्वप्न भंगेल. तर गुणतालिकेत टॉपला असलेल्या गुजरात टायटन्सला तीन पैकी तीन सामने जिंकावे लागतील. म्हणजेच गुजरातचे 22 गुण होतील.
  • गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला दिल्लीने दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत केलं पाहीजे. यामुळे चार गुणांची कमाई होईल. दुसरीकडे चेन्नईला कोलकात्याने पराभूत करण्यास अपयशी ठरला तरी त्यांचे 15 गुण होतील. चार सामने जिंकत दिल्लीचे 16 गुण होतील. म्हणजेच चेन्नईचा अडसर दूर होईल.
  • गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊने तीन पैकी दोन सामने गमावले तर दिल्लीला संधी मिळेल. कारण लखनऊचे 11 गुण आहेत. दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला तर 15 गुण होतील. म्हणजेच लखनऊचा अडसर दूर होईल.
  • गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या राजस्थानचे 10 गुण आहेत आणि अजून तीन सामने खेळायचे आहेत. म्हणजेच 3 सामने जिंकले तर 6 गुण कमाई होईल आणि एकूण 16 गुण होतील. जर दिल्लीकडे रनरेट चांगला असेल तर राजस्थान ऐवजी दिल्लीला संधी मिळेल. तीन पैकी एक सामना गमावल्यास दिल्लीच्या वाटेतील राजस्थानचा अडसर दूर होईल.
  • गुणतालिकेत कोलकात्याचा संघ पाचव्या स्थानी आहे. कोलकात्याचे एकूण 10 गुण असून तीन सामने खेळायचे आहेत. तीन सामन्यात 6 गुण कमावयची संधी आहे. कोलकात्याचे तिन्ही सामने टॉप फोरमध्ये असलेल्या राजस्थान, चेन्नई आणि लखनऊसोबत आहे. यापैकी हार जीत पाहता चार पैकी एक संघ बाद होईल.कोलकात्याने तिन्ही सामने जिंकले तर 16 गुण होतील. नेटरनरेटवर दिल्ली आणि कोलकात्याचं प्लेऑफचं ठरेल.
  • गुणतालिकेत आरसीबी आणि मुंबई अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्यात एका विजय आणि पराभ निश्चित आहे. त्यामुळे उरलेल्या तीन सामन्यात आरसीबीला गुजरात आणि हैदराबादनं हरवलं तर मात्र आरसीबीचा अडसर दूर होईल.मुंबईला गुजरात आणि हैदराबादनं हरवलं तर मुंबई रेसमधून बाहेर असेल.
  • गुणतालिकेत पंजाब सातव्या स्थानावर आहे. उर्वरित तीन पैकी दौन सामने दिल्लीसोबत आहे. दिल्लीला काहीही करून या सामन्यात पंजाबला पराभूत करावं लागले. त्यामुळे पंजाबचा मार्गही मोकळा होईल.
  • हैदराबादचे चार सामने उरले आहेत. या पैकी दोन सामन्यात पराभव झाला तर दिल्लीचा मार्ग मोकळा होईल. गुजरातने हैदराबादसोबतचा सामना जिंकला तर मार्गच मोकळा होईल. त्यात मुंबई, आरसीबी, लखनऊसोबत उर्वरित सामने आहेत.