मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 तिकीट बुकिंग करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कप तिकीट बुकिंगबाबत मोठी माहिती दिली आहे. वर्ल्ड कप सामन्यांचे ऑनलाईन तिकीट हे बूक माय शोवरुन मिळवता येणार आहे. बीसीसीआयने ऑनलाईन तिकीटींगची सर्व जबाबदारी बूक माय शो या अॅपला दिली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बूक माय शो देशातील प्रतिष्ठित तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म, ज्यावरुन अनेक सिनेमांची ऑनलाईन तिकीटं बूक केली जातात. आयसीसी वनडे वर्ल्ड 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल. एकूण 58 सामने होणआर आहेत. तर 10 सराव सामने हे एकूण 3 शहरात पार पडणार आहेत.
तिकीट विक्रीला शुक्रवार 25 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पहिल्या टप्प्यात टीम इंडियाच्या प्रॅक्टीस मॅचचा अपवाद वगळता सर्व सराव सामन्यांची तिकीटं ऑनलाईन बूक करता येतील. तर टीम इंडियाच्या सराव सामन्यां तिकीटं ही 30 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. टीम इंडिया इंग्लंड आणि नेदरलँड विरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
तर 31 ऑगस्टपासून टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील चेन्नई, दिल्ली आणि पुण्यात होणाऱ्या सामन्यांची तिकीटं खरेदी करु शकतात. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया (चेन्नई), 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली) आणि 19 ऑक्टोबर बांगलादेश (पुणे) सामने खेळणार आहे.
त्यानंतर 1 सप्टेंबरपासून धर्मशाळा, लखनऊ आणि मुंबईत होणाऱ्या सामन्यांची तिकीट बुकिंग सुरु होणार आहे. टीम इंडिया 22 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध धर्मशाळा येथे खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्धचा सामना हा 29 ऑक्टोबर (लखनऊ) आणि श्रीलंका विरुद्ध 2 नोव्हेंबर (मुंबई) इथे खेळणार आहे.
त्यानंतर 2 सप्टेंबरपासून कोलकाता आणि बंगळुरुतील सामन्यांची तिकीट विक्री होणार आहे. टीम इंडिया 5 नोव्हेंबर साऊथ अफ्रिका (कोलकाता) आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध (बंगळुरु) भिडणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना हा 14 ऑक्टोबरला अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या महामुकाबल्याचं तिकीट बुकिंगला 3 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर यानंतर सेमी फायनल आणि फायनल तिकीट विक्रीला सुरुवात होईल. या नॉक आऊट राऊंडमधील सामन्यांत्या तिकीट विक्रीला 15 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरु असेल.
दरम्यान ऑनलाईन तिकीट बूक केल्यानंतर ठिकाण सांगितलं जाईल. सामन्याच्या दिवशी तिथे जाऊन तिकीटची हार्ड कॉपी घ्यावी लागेल. तर दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन बूक केलेली तिकीट घरी हवी असेल तर कूरियर चार्ज म्हणून 140 रुपये अधिकचे द्यावे लागतील. महत्वाची बाब म्हणजे क्रिकेट चाहत्यांना ई तिकीट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे 140 रुपये अधिक खर्च करुन तिकीट घरी मागवा किंवा सामन्याच्या दिवशी संबंधित ठिकाणी जाऊन ते ताब्यात घ्या.