मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धा ही आशिया खंडातील क्रिकेट संघांसाठी आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्तवाची आहे. आशिया कप स्पर्धा ही वर्ल्ड कपची रंगीत तालीम आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये सर्वच संघ धमाकेदार कामगिरी करत वर्ल्ड कपसाठी सज्ज होणार आहेत. आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये 50 ओव्हर्सचे मॅचेस होणार आहेत. त्यामुळे आशिया कपमधून वर्ल्ड कपची संपूर्ण तयारी होणार आहे. या आशिया कपमध्ये टीम इंडिया आपला पहिलाच सामना हा पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबर होणार आहे. टीम इंडिया या महामुकाबल्यासाठी जोरात तयारीला लागलीय.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार बॅट्समन विराट कोहली याला आशिया कपमध्ये मोठा कारनामा करण्याची संधी आहे. विराटला सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक वनडे शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतकं केली आहेत. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली याने आतापर्यंत 275 वनडे मॅचेसमध्ये 46 सेंच्युरी केल्या आहेत. त्यामुळे 3 शतकं केल्यास विराट सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करु शकतो. तर 4 शतक केल्यास विराटच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड होईल.
आशिया कपमध्ये एकूण 13 सामने होणार आहेत. स्पर्धेत एकूण 6 संघ साखळी फेरीत प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. टीम इंडियासोबत ए ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ आहेत. त्यामुळे टीम इंडिया आधी पाकिस्तान आणि मग नेपाळसोबत खेळणार आहे. दोन्ही ग्रुपमधून प्त्येकी 2 संघ सुपर 4 मध्ये पोहचतील. या सुपर 4 मध्ये टीम इंडिया पोहचल्यास आणखी एक मॅच खेळण्याची संधी टीम इंडियाला मिळेल. टीम इंडिया आशिया कपची प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे विराट कोहली याला सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक किंवा बरोबरी करण्याची संधी आहे.
आशिया कप 2023 साठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज मोहम्मद शमी, आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन (विकेटकीपर)