मुंबई: भारतीय खेळाडूंच बर्मिघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शानदार प्रदर्शन सुरु आहे. 7 व्या दिवशी भारताने पॅरा पावरलिफ्टिंग आणि लांब उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक विजेती कामगिरी केली. भारताची एकूण मेडल्सची संख्या 20 झाली आहे. यात 6 सुवर्णपदकं आहेत. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 8 व्या दिवशी महीला हॉकी वर सगळ्यांच्या नजरा असतील. ते आपलं पदक निश्चित करण्यासाठी मैदानात उतरतील.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या कुस्तीवीरांनी कमाल केलीय. बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक आणि अंशु मलिक यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. वेगळ्या-वेगळ्या वजनी गटात या खेळाडूंनी उत्तम खेळ सादर करत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट केलं. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्यासह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करत 86 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्याने 3-0 अशी लीड शेवटपर्यंत कायम राखली आणि गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं.
Feeling proud of the spectacular sporting performance by our very own Deepak Punia! He is India’s pride and has given India many laurels. Every Indian is elated by his winning the Gold medal. Best wishes to him for all upcoming endeavours. pic.twitter.com/tk9NuAIN1s
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2022
स्क्वाशमध्ये महिला दुहेरीत भारताची स्टार जोडी स्पर्धेबाहेर फेकली गेलीय. जोत्सा चिनाप्पा आणि दीपिका पल्लीकल कार्तिकला मलेशियन जोडीने 11-2, 11-7 ने पराभूत केलं. भारताला या जोडीकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आता ही जोडी स्पर्धेतून बाहेर गेली आहे.
महिलांच्या 62 किलो वजनी गटात भारताच्या साक्षी मलिकेने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तिने कॅनडाच्या एमना गोडिनेजवर विजय मिळवलाय. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये काहीसी हतबल ठरलेल्या साक्षीने दुसऱ्या हाफमध्ये शानदार खेळ करत गोल्ड मेडल जिंकलं.
Sakshi Malik, take a bow ??
Great comeback to win from 0-4 behind, congratulations on winning Gold ? ?? #CWG2022India pic.twitter.com/cGgFbMpCJ3— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 5, 2022
भारताचा स्टार रेसलर बंजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याने कॅनडाच्या लालकलन मॅक्निलला 9 – 2 अशा फरकाने पराभूत केलं. हे त्याचं सलग दुसरं सुवर्णपदक आहे.
सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजरंग पुनियाचं अभिनंदन केलं आहे.
Congratulations to Bajrang Punia for winning second successive gold in wrestling at the #CommonwealthGames & creating history. Your consistency, dedication & excellence are inspirational for our youth. Your gold medals reflect the urge to be the best, the spirit of the new India.
— President of India (@rashtrapatibhvn) August 5, 2022
रोमांचक फायनलमध्ये अंशु मलिकला 4 – 6 ने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, ती सिल्व्हर मेडल जिंकण्यात यशस्वी ठरली. नायजेरियाची दिग्गज खेळाडू ओडुनायो फोलसाडेने तिसऱ्यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. अशुंने शेवटच्या डावावर अपील केलं मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही.
मनिक्का बत्रा आणि जी साथियान यांची जोडी क्वार्टर फायनल मॅचमध्ये पराभूत झाली. मलेशियाच्या चूंग आणि केरन लायने यांच्या जोडीने मागील कॉमनवेल्थ गेम्समधील ब्रॉन्झ मेडलिस्ट आणि जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर असलेल्या जोडीला 12-10, 9-11, 8-11, 11-7, 11-7 ने पराभूत केलं.
शरत कमल आणि श्रीजा अकुला यांच्या जोडीने इंग्लंडच्या हो टिन टिन आणि पिचफर्ड लियाम यांना मात देत सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. 11-7, 8-11, 11-8, 11-3, 11-9 अशा फरकाने त्यांनी सामना आपल्या नावावर केला. टिन टिन आणि पिचफर्डची जोडी कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन वेळा सिल्व्हर मेडल जिंकली आहे. त्यामुळे भारतासाठी हा मोठा विजय आहे.
गोल्ड मेडलसाठी दीपक पुनियाचा सामना पाकिस्तानच्या इनामसोबत होणार आहे. इनामने सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा रेसलर एडवर्ड लेसिंगविरोधात 3 – 5 अशा फरकाने विजय मिळवलाय.
भारताचा मोहित ग्रेवालला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. कॅनडाच्या अमरवीर धेसी याने 2 – 12 च्या फरकाने मोहितचा पराभव केला. तरीही मोहीत ग्रेवाल मेडलच्या स्पर्धेत कायम आहे.
भारताचा स्टार युवा रेसलर दीपक पुनियाने सेमीफायनलच्या सामन्यात कॅनडाच्या एलेक्सजेंडक मोरेला 3 – 1 अशा फरकाने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यासह पुनियाचं रेसलिंगमधील एक मेडल निश्चित झालं आहे.
भारताच्या अंशु मलिकने सेमीफायनलमध्ये नेथमी अहिंसाला 10 – 0 अशा फरकाने पराभूत केलंय. त्यामुळे अंकु मलिकने भारताच्या खात्यात अजून एक पदक टाकलं आहे. रेसलिंगमध्ये अंशुने भारताला पहिलं पदक मिळवून दिलंय.
86 किलो वजनी गटात दीपक पुनियाने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. दीपकने हा सामना 10 – 0 अशा फरकाने आपल्या नावावर केला. ता तो मेडलपासून एक विजय दूर आहे.
रेसलिंगमध्ये भारतासाठी पहिली वाईट बातमी आहे. दिव्या काकरानला नायजेरियाच्या ब्लेसिंग ओबोरुदुदुकडून पराभव पक्तरावा लागला आहे. 68 किलो वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये दिव्याचा 0 – 11 ने पराभव झाला.
पी. व्ही. सिंधुने राऊंड ऑफच्या सामन्यात सोप्यारितीनं विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. तीने यूगांडाच्या हसिना कबूगाबेला 21-10, 21-9 ने पराभूत केलं.
भारताच्या मोहित ग्रेवालने सिपरसच्या लेकसियसला 10 – 1 अशा फरकानं पराभूत केलं. तो आता 125 किलोग्राम वर्गात सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. भारतीय रेसलर्स एका पाठोपाठ एक सामना जिंकत जात आहेत.
भारताची ऑलिंम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिकने 62 किलो वजनी गटात इंग्लंडच्या केलसी बारनेसला 10-0 ने हरवलं. साक्षीने क्वार्टरफायनल मॅच जिंकण्यासाठी 70 सेकंदापेक्षा पण कमी वेळ घेतला
भारताची युवा कुस्तीपटू अंशुने 57 किलो वजनीगटाच्या क्वार्टर फायनल मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाच्या इरीन सायमयोनिडिसवर मात केली. अंशुने सामना जिंकण्यासाठी एक मिनिटापेक्षा पण कमी वेळ घेतला.
किदांबी श्रीकांतने राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सहजतेने विजय मिळवला. त्याने श्रीलंकेच्या दमिंदु अबे निक्रामावर 21-9, 21-12 असा विजय मिळवला. श्रीकांत आता क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला आहे.
हरमीत देसाई आणि सनील शेट्टीच्या जोडीने टेबल टेनिस मध्ये पुरुष डबल्सच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी 11-3, 9-11, 11-9, 11-7 ने सामना जिंकला.
भारतीय खेळाडू रीथचा फेंगने 41 व्या वुमेन्स सिंगल प्री क्वार्टर फायनल मॅच मध्ये पराभव केला.
तृषा जॉली आणि गायत्री गोपीचंदच्या जोडीने वुमेन्स डबल्सच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने जेमिमाह आणि मुंग्रहच्या जोडीवर 21- 2, 21- 4 असा विजय मिळवला.
भारतीय पुरुष टीमने 4 x 400 मीटर रिले मध्ये दमदार प्रदर्शन केलं. पुरुष संघ फायनल मध्ये पोहोचला आहे. हीट 2 मध्ये मोहम्मद अनस, नोह निर्मल, मोहम्मद अजमल आणि अमोज जॅकबची चौकडी 3:06.97 वेळेसह दुसऱ्या स्थानावर राहिली.
श्रीजा अकुलाने वेल्सच्या चार्लोट कॅरीला हरवून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. टेबल टेनिस मध्ये भारताच शानदार प्रदर्शन सुरु आहे.
मनिका बत्राने ऑस्ट्रेलियाच्या मिंहयुंग जी ला 4-0 ने हरवून महिला एकेरीच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे.
बजरंग पुनिया नंतर दीपक पुनियाने सुद्धा कमाल केली आहे. त्याने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला पुरुषांच्या फ्री स्टाइल 86 किलो वजनी गटात नमवलं.
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने पहिला सामना सहजतेने जिंकला. त्याच्या समोर लो बिंघमच आव्हान होतं.
भारताची ज्योति याराजी महिला 100 मीटर हर्डल राऊंड 1 हीट 2 मध्ये चौथ्या स्थानावर आहे. तिने 13.18 सेकंदाचा वेळ घेतला.
पॅरा टेबल टेनिस मध्ये भारताचं आणखी एक मेडल निश्चित झालं आहे. भाविना पटेलने इंग्लंडच्या सुई बेलेचा 11-6, 11-6, 11-6 असा पराभव केला. महिला सिंगल्स क्लास 3-5 च्या फायनल मध्ये पोहोचली आहे.
मनिका बत्रा आणि जी साथियान नंतर शरत कमल आणि अकुला श्रीजाच्या जोडीने विजय मिळवला आहे. मिक्स्ड डबल्स मध्ये भारतीय जोड़ीने मलेशियाच्या ली चांग फेंग आणि हो यिंग जोडीवर 1-3 असा विजय मिळवला.
दिपक केसरकर
– महाराष्ट्रात सध्या सुगीचं वातावरण पसरवलं जातंय
– सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्यजींची बदनामी करण्यात राणेंनी अनेक पत्रकार परिषद घेतला
– भाजपातल्या लोकांनी सांगितलं की आमचा देखील अशा बदनामीला विरोध होता
– *मी नरेंद्र मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या *
– पंतप्रधान आणि उद्धवजींचा डायलाॅग सुरु झाला होता
मनिका बत्रा आणि जी साथियानच्या जोडीने मिक्सड डबल्सच्या प्री क्वार्टर फायनल मध्ये नायजेरियाच्या ओमोटायो आणि जोक ओजेमुला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
दिलेल्या मंजुरी तपासून घेण्यासाठी स्थगिती दिली आहे
फक्त शाहू महाराजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती दिलेले नाही
आघाडी सरकारने दहा कोटी दिले असतील पुढील काळात 50 कोटी लागणार असतील तर देऊ
विरोधकांनी समाजात संभ्रम पसरवू नये
लोकशाहीमध्ये आंदोलन प्रत्येकाचा अधिकार
फक्त शाहू महाराजच नाही तर सर्वच महापुरुषांच्या कामाची पूर्तता करेल
कोण काय इशारा देतो याला मी महत्त्व देत नाही
इशारा देण आंदोलन करणं हा त्यांचा हक्क
माझ्यासारखा 36 वर्षे काम करणारा कार्यकर्ता ठाकरे कुटुंबाला सोडून जातो
तेव्हा तरी विचार व्हायला हवा होता
ठाकरे कुटुंबीयांची आमच्या भावना जोडल्या गेल्यात
पण शिंदे साहेब आमचे राजकीय गुरू
उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित होता असं वाटत नाही
शिवसैनिकांमध्ये आपसात अशा घटना होऊ नयेत ही माझी भावना आहे
पूर्वी शिवसेना नेत्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालं नाही ते आता एकनाथ शिंदे यांचे होतय
जनतेने त्यांना स्वीकारलय
कोल्हापूर जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे
दौऱ्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होईल
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना नेत्याचं आतापर्यंत झालं नाही एवढं मोठं स्वागत त्यांचं होईल
पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा भव्य असेल
2 राऊंड मध्ये पिछाडीवर राहिल्यानंतर भारताने जोरदार पलटवार केला आहे. चौथ्या राऊंड मध्ये भारतीय जोडीने 5-2 अशी आघाडी मिळवली आहे.
भारत आणि इंग्लंड मध्ये वुमेन्स पेयर्सचा क्वार्टर फायनलचा सामना सुरु आहे. वुमेन्स फोर मध्ये भारताने पहिला किताब जिंकून इतिहास रचला आहे. भारत आता आणखी एक मेडल आपल्या नावावर करु शकतो.