कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज़: कॉमनवेल्थ गेम्सचा आज सहावा दिवस आहे. आजही भारताकडे मेडल जिंकण्याच्या अनेक संधी आहेत. वेटलिफ्टिंग आणि अन्य खेळांमध्ये भारताकडे पदक विजेती कामगिरी करण्याची संधी आहे. काही खेळांमध्ये भारतीय संध पदक जिंकण्याच्या जवळ जाताना दिसेल. क्रिकेटबद्दल बोलायच झाल्यास, आज बारबाडोसच्या टीमला हरवून भारतीय महिला क्रिकेट संघ सेमीफायनल मध्य पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
भारताकडून आणखी एका पदकाची कमाई! सौरव घोषालने स्क्वाश या क्रीडा प्रकारात पटकावले ब्रॉन्ज मेडल
भारतीय पुरुष हॉकी टीम ग्रुप राउंड मध्ये आज कॅनडाचा सामना करत आहे. पहिल्या क्वार्टर मध्ये भारताकडे 2-0 अशी आघाडी आहे. भारताकडून पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंहने शानदार ड्रॅग फ्लिक करुन गोल केला. त्यानंतर रोहिदासने दुसरा गोल डागला.
बॉक्सिंग मध्ये भारताचं आणखी एक मेडल निश्चित झालं आहे. मोहम्मद हुसमुद्दीनने नाम्बियाच्या ट्राय अगेनवर 4-1 असा विजय मिळवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. त्याने एक मेडल निश्चित केलं आहे.
भारतीय महिला टीमने बुधवारी हॉकी मध्ये कमाल केली. ग्रुप ए पूल मॅच मध्ये भारताने कॅनडाला रोमांचक सामन्यात 3-2 ने हरवलं.
भारतीय बॉक्सर नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात निकलोस क्लाइडला हरवून सेमीफायनल मध्ये स्थान निश्चित केलं आहे. नीतूने बॉक्सिंग मध्ये भारतासाठी मेडल निश्चित केलं आहे.
भारताच्या तुलिका मानने महिलांच्या 78 प्लस वजनी गटात फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तिने सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडच्या सिंडी एंड्रयूचा पराभव केला. तिने देशासाठी ज्युडो मध्ये तिसरं मेडल निश्चित केलं आहे.
जोश्ना चिनाप्पा आणि हरिंदर पाल सिंहच्या जोडीने मिक्स्ड डबल्समध्ये श्रीलंके विरुद्ध 8-11, 11-4,11-3 असा विजय मिळवला.
हॉकी सामन्यात पहिल्या हाफ मध्ये भारताने 2-1अशी आघाडी मिळवली आहे. हा लीड जास्तीत जास्त वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतासाठी पहिला गोल सलीमाने आणि दुसरा लालरेमसियामीच्या पासवर नवनीतने केला.
ज्युडो मध्ये भारताच्या तुलिका मानने 78 प्लस वजनी गटात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. तिने मॉरिशेसच्या ट्रेसी डरहोनचा पराभव केला.
वेटलिफ्टिंग मध्ये आणखी एक मेडल मिळालं आहे. भारताच्या खात्यात एकूण 14 पदकं झाली आहेत. वेटलिफ्टर लवप्रीत सिंहने ब्राँझ मेडल मिळवलं. त्याने एकूण 355 किलो वजन उचललं.
महिलांच्या पूल मध्ये भारत आणि कॅनडा मध्ये सामना सुरु झाला आहे. भारताला सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर मिळालाय. वंदनाने त्या कॉर्नरच गोलमध्ये रुपांतर केलं.
भारताची पॅरा टेबल टेनिस खिळाडू भाविना पटेलने विजयाने सुरुवात केली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या डॅनिया डी टोरोला 3-1 ने हरवलं. टोक्यो ओलिंपिक चॅम्पियनकडून इथे गोल्ड मेडलची अपेक्षा आहे.
भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंहने क्लीन अँड जर्क मध्ये चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या प्रयत्नात त्याने 185 किलो वजन उचललं. दुसऱ्याप्रयत्नात त्याने 189 किलो वजन यशस्वीरित्या उचललं.
ज्युडो: 100 किलो वजनी गटात भारताच्या दीपक देस्वालचा क्वार्टर फायनल मध्ये इंग्लंडच्या हॅरी लव्हेलकडून पराभव झाला.
लवप्रीतने वेटलिफ्टिंग मध्ये आणखी एका गोल्ड मेडलची अपेक्षा निर्माण केली आहे. स्नॅचच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने 163 किलो वजन उचललं.
पुरुषांच्या 109 किलो वजनी गटातील फायनल मध्ये भारताच्या लवप्रीतने स्नॅच मध्ये पहिल्या प्रयत्ना 157 किलो वजन उचललं.
दीपक देशवाल पुरुष -100k किग्रा इवेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
पुरुषांच्या 109 किलो वजनी गटातील सामने सुरु झाले आहेत. पाकिस्तानच्या हनजाला बट्टने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचललं.
सारा कुरुविलाने गयानाच्या मॅरी विरुद्ध 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
लॉन बॉल मध्ये पुरुषांच्या सिंगल्स राऊंडच्या दुसऱ्या सामन्यात मृदुलने क्रिसवर 21-5 असा दणदणीत विजय मिळवला.
Lawn Bowls मध्ये भारताच्या वुमेन्स फोरने गोल्ड जिंकून इतिहास रचला आहे. आता सिंगल्स आणि पेयर्स मध्ये भारताची पदकावर नजर आहे. महिला पेयर्स मध्ये भारतीय टीमने 7-4 अशी आघाडी घेतली आहे.
पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या मृदुलने क्रिस लॉक विरुद्ध 2 थ्रो संपल्यानंतर 4-0 अशी आघाडी घेतली आहे.
सध्या प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे त्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. कोर्ट योग्य निर्णय देईल आमचा न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
Day 5 is done. Here’s how the table is looking?
Watch out South Africa, India are hot on your tail?
Follow all tomorrow’s action ⬇️https://t.co/8u2EKSwAjk @TeamSA2024 @WeAreTeamIndia pic.twitter.com/QCvkz5PpOn
— Birmingham 2022 (@birminghamcg22) August 2, 2022
भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज बारबाडोस विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास सेमीफायनलच तिकिट पक्क होईल. भारताने याआधीच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला. यंदा कॉमनवेल्थ मध्ये टी 20 महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
The @BCCIWomen team out there to support @TheHockeyIndia earlier today. ?? #CWG22 #B2022
?: @imharleenDeol / @WeAreTeamIndia pic.twitter.com/UobvHt0xpV— Women’s SportsZone #B2022 (@WSportsZone) August 2, 2022
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आज भारताचे काही खेळाडू मैदानात दिसतील. भारताचे तीन वेटलिफ्ट यात पुरुषांच्या 109 किलो वजनी गटात लवप्रीत सिंह, महिलांच्या 87 किलो वजनी गटात पूर्णिमा पांडे आणि पुरुष गटात गुरदीप सिंहवर नजर असेल.
Cheering for our badminton team ✌️✌️. Come on India…. pic.twitter.com/U0PKU96CA2
— Jeremy Lalrinnunga (@raltejeremy) August 2, 2022
बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एका टप्पा पूर्ण झाला आहे. राष्ट्रकुलचे पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मेडल्ससाठीची स्पर्धा वेग पकडतेय. पदकतालिकेत तिसऱ्या स्थानापासून ही शर्यत सुरु होतेय. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाकडे विशाल आघाडी असून त्यांचा दबदबा कायम आहे.