कॉमनवेल्थगेम्स(CWG) लेटेस्ट न्यूज़: कॉमनवेल्थ गेम्सचा आज 7 वा दिवस आहे. भारतीय खेळाडू आजही वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात पदकविजेती कामगिरी करु शकतात. भारताने सर्वाधिक मेडल्स आतापर्यंत वेटलिफ्टिंग मध्ये जिंकले आहेत. आता बॉक्सिंग मध्येही अशीच कमाल दिसू शकते. बर्मिंघमच्या रिंग मध्ये आज 4 भारतीय बॉक्सर्सचे मेडल पक्के होऊ शकतात. भारत पदकतालिकेत सध्या सहाव्या स्थानावर आहे. बॉक्सिंग शिवाय हॉकी, लॉन बॉल, स्क्वॉश, एथलॅटिक्स मध्येही भारतीय खेळाडू आपली दावेदारी सिद्ध करु शकतात.
स्क्वॉश मध्ये महिला डबल्स गटात भारताच्या जोश्ना चिनाप्पा आणि हरिंदर पाल सिंहला डोना लोबन आणि कॅमरुन पिलेच्या ऑस्ट्रेलियन जोडीने 8-11, 9-11 असं हरवलं.
भारतीय बॉक्सर्सच कॉमनवेल्थ मध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. जॅस्मिनने महिलांच्या 60 किलो वजनीगटात गुरुवारी न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टनवर 4-1 असा विजय मिळवला. जॅस्मिनने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. तिने भारतासाठी आणखी एक मेडल निश्चित केलं आहे.
सुनयना कुरुविला आणि अनाहत सिंहने महिला डबल्सच्या राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं आहे. भारतीय जोडीने श्रीलंकेच्या जोडीवर 11-9, 11-4 अशी मात केली.
– Prakash Javadekar (@prakashjavadekar) 3 Aug 2022
किदांबी श्रीकांतने सहज विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 मध्ये त्याने उगांडाच्या डॅनियलला 21-8, 21-9 असं हरवलं.
भारताची पॅरा टेबल टेनिस खेळाडू सोनलबेन पटेलने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. सोनलबेनने नायजेरियाच्या चिनायावर 1-3 अशी मात केली.
मिक्सड डबल्स मध्ये भारताच्या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राऊंड ऑफ 32 मध्ये अश्विनी पोनाप्पा सुमित रेड्डीच्या जोडीला इंग्लंडच्या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. 18-21, 16-21 असा त्यांनी सामना गमावला.
भारतासाठी आणखी एक मेडल पक्क झालं आहे. अमित पंघालने स्कॉटलंडच्या लेनना 5-0 ने हरवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्याचा पुढचा सामना सहा ऑगस्टला होईल.
भाविना पटेलने ग्रुप 1 च्या आपल्या सामन्यात फिजीच्या अकानिसी लाटू ला 3-0 ने हरवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पेल्हार प्रभाग एफच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि इंजिनिअर अँटी करप्शनच्या जाळ्यात
अनाधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी रोख रक्कम मागितली असल्याची प्राथमिक माहिती
सहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये आणि इंजिनिअर हितेश जाधव यांना अँटी करप्शने घेतले ताब्यात
पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मंजू बालाने शेवटच्या प्रयत्नात 59.68 मीटर अंतरापर्यंत थ्रो फेकून फायनल मध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये क्वालिफाय करण्यासाठी 68.00 मीटरचा क्वालिफाय मार्क होता. पण टॉप 12 मध्ये असल्याने तिचं फायनल मधील स्थान पक्क झालं.
पीव्ही सिंधुने कॉमनवेल्थ स्पर्धेत राऊंड ऑफ 32 मध्ये मोठा विजय मिळवला. तिने मालदीवच्या फातिमाथ नाबाहला 21-4, 21-11 असं सरळ गेम मध्ये हरवलं. सिंधु आता राऊंड ऑफ 16 मध्ये दाखल झालीय.
बॅडमिंटन मध्ये पीव्ही सिंधुचा राऊंड ऑफ 32 सामना सुरु झालाय. मालदीवच्या फतिमाथ नाबाहा विरुद्ध ती खेळतेय. या सामन्यात विजय मिळवणं सिंधुसाठी फार अवघड नाहीय.
भारताच्या हिमा दासने 200 मीटर हिट्स मध्ये 23.42 सेकंदाचा वेळ नोंदवला. तिने टॉप कामगिरी करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे.
सरिता सिंह आणि मंजू बाला हॅमर थ्रो च्या क्वालिफाइंग राउंड मध्ये खेळणार आहेत. सरिताने आपल्या पहिल्या प्रयत्नात 57.48 मीटरचा थ्रो फेकला.
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तेजस्वीन शंकरने लांब उडी मध्ये देशासाठी पहिलं पदक जिंकलं. त्याने नवीन इतिहास रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Tejaswin Shankar creates history. He wins our first high jump medal in the CWG. Congratulations to him for winning the Bronze medal. Proud of his efforts. Best wishes for his future endeavours. May he keep attaining success. @TejaswinShankar pic.twitter.com/eQcFOtSU58
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2022