मुंबई: भारताची ज्युडो पटू तुलिका मानने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कमाल केली आहे. तिने 78 किलो वजनी गटात फायनल मध्ये प्रवेश केला आहे. ज्युडो मध्ये भारतासाठी तिसरं मेडल निश्चित झालं आहे. तुलिकाने गोल्डची अपेक्षा निर्माण केली आहे. सुशीला देवीने ज्युडो मध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. आता तुलिकाकडून देशाला गोल्डची अपेक्षा आहे. भारताच्या तुलिकाने न्यूझीलंडच्या सिडनी एंड्रयूजला हरवून फायनल मध्ये प्रवेश केला.
तुलिकाने 1 मिनिट 53 सेकंदात सामना जिंकला. तुलिकासाठी इथवर पोहोचण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. वडिलांची हत्या झाल्यानंतर तिचा खरा संघर्ष सुरु झाला. त्यावेळी तुलिका 14 वर्षांची होती. वडिल सतबीर मान यांची बिझनेस मधील वैरत्वाच्या भावनेतून हत्या करण्यात आली. त्यानंतर तुलिकाचं पालनपोषण आईने केलं. त्या दिल्ली पोलीस मध्ये सब-इंस्पॅक्टर आहेत.
तुलिका आधी वडिलांच्या हत्येनंतर त्या धक्क्यातून बाहेर पडली. करीयरवर तिने लक्ष दिलं. 2018 साली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणं तिच्यासाठी कठीण बनलं होतं. तुलिकाला TOP योजनेतून बाहेरही करण्यात आलं होतं.