दिनेश कार्तिकच्या पत्नीने केलं बंड, अखेर फेडरेशन दीपिका पल्लीकल समोर झुकलं

| Updated on: Jul 27, 2022 | 12:19 PM

दिनेश कार्तिक आणि भारताची स्टार स्कवॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिल जातं. दिनेशने क्रिकेटच्या मैदानात यश मिळवलं, तर दीपिकाने स्क्वॉश कोर्टवर.

1 / 5
दिनेश कार्तिक आणि भारताची स्टार स्कवॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिल जातं. दिनेशने क्रिकेटच्या मैदानात यश मिळवलं, तर दीपिकाने स्क्वॉश कोर्टवर. दीपिकाने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एक गोल्ड आणि दोन रौप्य पदकं मिळवली आहेत. आता बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सवर तिची नजर असेल.

2 / 5
दीपिका पल्लीकलने भारतात स्क्वॉशचा खेळ खूप पुढे नेला. ती फक्त खेळच पुढे घेऊन गेली नाही, तर त्यात बदलही घडवला.

3 / 5
दीपिका 2012 ते 2015 पर्यंत राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाली नाही. महिला विनरला मिळणाऱ्या पारितोषिकाच्या रक्कमेवर ती नाराज होती.

4 / 5
त्यावेळी चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष विनरच्या तुलनेत महिला विनरला फक्त 40 टक्के प्राइस मनी मिळायचा. पुरुष आणि महिला विनरला समान बक्षीसाची रक्कम मिळावी, यासाठी पल्लीकलने एकप्रकारचं बंड केलं.

5 / 5
दीपिकाच्या जिद्दीसमोर फेडरेशनला झुकावं लागलं. 2016 साली चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष आणि महिला विनरला समान इनामी रक्कम दिली गेली. 2016 मध्ये दीपिकाने जोशना चिनप्पाला हरवून दुसऱ्यांदा किताब जिंकला.