CMG 2022 : 0.1 सेकंद उशिर झाल्याने हिमा दासचा पराभव, 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा 9 वा दिवस

| Updated on: Aug 06, 2022 | 2:41 PM

नामिबियाच्या क्रिस्टीन म्बोमा ऑस्ट्रेलियाच्या एला कोनोली यांनी टॉप दोनमध्ये स्थान मिळविल्याने त्यांनी अंतिम फेरी गाठली. हिमा दास हीने अत्यंत कसोशीने प्रयत्न केला.

CMG 2022 : 0.1 सेकंद उशिर झाल्याने हिमा दासचा पराभव,  22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा 9 वा दिवस
0.1 सेकंद उशिर झाल्याने हिमा दासचा पराभव, 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा 9 वा दिवस
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : इंग्लंडमध्ये (England) सुरू असलेल्या राष्ट्रकुल CMG 2022 च्या महिलांच्या 200 मीटर स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. हिमा दास (Himadas) अंतिम फेरीत स्थान मिळवू शकली नाही. खरंतर आज तिची स्पर्धा पाहत असताना लोकांचे डोळे नक्की पाणावले असतील. कारण ती 1 किंवा 2 सेकंदाने नाही तर 0.1 सेकंदाने अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही. हिमा दासने 200 मीटरच्या उपांत्य फेरीत 23.42 सेकंदात तिसरे स्थान पटकावले. नामिबियाच्या क्रिस्टीन म्बोमा ऑस्ट्रेलियाच्या एला कोनोली यांनी टॉप दोनमध्ये स्थान मिळविल्याने त्यांनी अंतिम फेरी गाठली. हिमा दास हीने अत्यंत कसोशीने प्रयत्न केला. परंतु तिला एका सेकंदामुळे तिसऱ्या क्रमांकावरती राहावं लागलं. तिचे भारतातील चाहते त्यामुळे निराश झाले आहेत.

सेकंदामुळे पराभव झाल्याने हिमा निराश झाली

ज्यावेळी धावण्याची शर्यत संपली त्यावेळी हिमा अत्यंत निराश झाल्याची पाहायला मिळाली. कारण आज तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. महिलांच्या 200 मीटर प्रकारात 3 उपांत्य फेरीचे सामने होते. द्वितीय क्रमांकाची फिनिशर एला कोनोलीने 23.41 सेकंद, तर हिमाने 23.42 सेकंद वेळ लागला. अत्यंत जवळच्या फरकाने पराभव झाल्यामुळे ती निराश झाली. आज दिवसभरात अनेक सामने होणार आहेत. त्यामुळे विविध खेळात अनेक खेळाडूंकडून पदाची अपेक्षा आहे.

22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज 9वा दिवस

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज 9वा दिवस आहे. कुस्तीत भारताने 8 व्या दिवशी सहा पदके जिंकली. यादरम्यान भारतीय कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली. भारताने आतापर्यंत 9 सुवर्णांसह 26 पदके जिंकली आहेत. भारतासाठी आजच्या 9व्या दिवशी एकूण 24 पदके पणाला लागतील. यापैकी सर्वाधिक 9 पदके कुस्तीत येण्याची अपेक्षा आहे. मात्र, यासाठी सर्व भारतीय कुस्तीपटूंना पात्रता फेरीतून जावे लागणार आहे. विनेश फोगटही कुस्तीपटूंमध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहे. तर बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचाही आज सामना आहे. भारतीय महिला क्रिकेट संघही उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.