नवी दिल्ली: केवळ कॉल करण्यासाठी फोनचा वापर करण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा फोन हा अविभाज्य अंग बनलाय. तुम्ही फोनचा वापर नेमका कसा करतात यावरुन तुमचं व्यक्तिमत्व दिसून येतं.फोन हा माणसाचं डिजिटल व्हर्जनच म्हणालया हवं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. फोनचा वापर करताना काही जण आत्यंतिक काळजी घेतात. तर काही जणांची भावना पूर्णपणे विरोधाभासी असते. स्वत:च्या मुलाप्रमाणं जपणाऱ्या काही व्यक्ती असतात तर काही कोणतीही काळजी न घेता फोनचा वापर करत असतात. खरं तरं फोन व त्याचा वापर करणारा व्यक्ती हा मुद्दाच नाही आहे. प्रत्येकाचं आपल्या डिव्हाईसोबत हटकं नातं असतं. प्रत्येकजण निश्चिंतपणे काळजी घेत असतोच. फरक असतो वर्तनातील बदलाचा.
तुम्ही फोनचा वापर कसा करतात यावरुन तुमचं व्यक्तिमत्व कळतं! आश्चर्य वाटलं ना? पण आम्ही तुम्हाला या कोड्याच्या उलगडा करणार आहोत. फोनचा वापर करण्याद्वारे नेमकं कशाप्रकारे विविध व्यक्तिमत्वांचा परिचय होतो जाणून घेऊया
आपल्या फोनचे कव्हर जणू पॉकेट असल्याचा उपयोग करणाऱ्या व्यक्तींचा या कॅटेगरीत समावेश होतो. सुट्टे पैसे आणि आधार कार्ड सारखे वारंवार विचारणा केले जाणारे कागदपत्रे ठेवण्यासाठी फोन कव्हरचा वापर केला जातो. यामुळे कागदपत्रे लवकर आणि योग्यवेळी उपलब्ध होतात. तुम्हाला याचं निश्चितच आश्चर्य वाटेल की फोनच्या कव्हर मध्येच पॉकेट का असू नये?
काही व्यक्तींचा फोनकव्हर तुलनेने रुंद आणि आकाराने जाड असतो. यामुळे गंमत म्हणून फोन खाली पाडण्याचा आत्मविश्वास मिळतो. काही यूजर त्यांचे फोनच्या संरक्षणाबद्दल अति काळजी घेतात. जणू आपल्या लहान बालकांप्रमाणं सांभाळ करतात. झोपले तरी एक डोळा उघडाच ठेवून फोन कडं लक्ष देणारं. फोनला जपणारे अत्यंत काठिण्यता असलेले ग्लोरिला ग्लासने बनलेले फोन कव्हर निवडतात
आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव निश्चितच घेतलेला असेल की फोन पासून काही काळ दूर जाणं अस्वस्थ करणार असतं. काही व्यक्ती अगदी वॉशरुमला जायचं असलं तरी सोबत फोन घेऊन जाणारंचं. खरं आश्चर्य वाटतं अंघोळी वेळी ते नेमकं कसं करत असतील!!
अशाप्रकारच्या व्यक्ती काळजी विरहित असतात. कव्हर नाही. स्क्रीन गार्ड नाही. या प्रकारच्या व्यक्ती बॉक्समधून फोन काढला तसाच वापरतात. आपण आशा करू शकतो की भीती नसल्याचे दाखवत ग्लोरिला ग्लास सह असलेल्या फोनचा वापर करण्य़ास प्राधान्य देत असतील.
इन्स्टावरील लोकप्रिय इन्फ्ल्युसर सत्स्या यांनी स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजरचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे याचा अंदाज देण्यासाठी असं वर्गीकरण केलं आहे.