मुंबई : हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तर पौर्णिमेच्या (Shrawan Purnima 2023) दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यंदा श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होणार असून ती 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत चालेल. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा म्हणतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी किंवा रक्षासूत्र बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण पौर्णिमेने हिंदी भाषीकांच्या श्रावण महिन्याचीही समाप्ती होणार आहे.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विविध तीर्थक्षेत्रांवर स्नान व दान करण्याची परंपरा आहे. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवन आनंदी होते. मात्र तिर्थक्षेत्री जाणे तुमच्यासाठी शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकून तुम्ही घरीच स्नान करू शकता आणि गरजूंना काही दान करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तर्पण किंवा पिंडदान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषही दूर होतो. यासोबतच सर्व प्रकारचे ग्रह दोषही दूर होतात.
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात – 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:58 पासून
श्रावण महिन्याची पौर्णिमा समाप्ती – 31 ऑगस्ट 2023 सकाळी 7.5 वाजता
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)