मुंबई : रक्षाबंधनाचा (Rakshabandhan 2023) सण श्रावण महिन्याच्या शेवटी म्हणजेच पौर्णिमेला साजरा केला जातो. या वेळी 30 ऑगस्टला हा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या अनेक दिवस आधीपासून बाजारात राख्यांची विक्री सुरू होते. या वेळी बाजारात विविध प्रकारच्या राख्यांची विक्री होते. तुम्हीही तुमच्या भावांसाठी राखी खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या भावाला अशा राख्या बांधू नका की त्याच्या दीर्घायुष्याऐवजी त्याच्यावर संकट येईल. राखी घेताना प्रत्येक बहिणीला वाटते की, तिने आपल्या भावासाठी अशी राखी घ्यावी जी खूप सुंदर असेल आणि राखी पाहून भावाला आनंद होईल, पण तुम्हाला माहित आहे का? की, राखीचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.
भावासाठी मिठाई निवडताना लक्षात ठेवा की मिठाईमध्ये कडकपणा नसावा. मिठाईमध्ये रस असावा, जेणेकरून भाऊ-बहिणीच्या नात्यात ओलावा टिकून राहिल. रक्षासूत्राप्रमाणेच मिठाईमध्येही काळा आणि तपकिरी रंग टाळावेत. जसे ब्लॅक जॅम आणि चॉकलेट इ. पारंपारिक आणि सांस्कृतिक मिठाई जसे की लाडू, दूध बर्फी, केशर बर्फी, स्पंज, रसमलाई इ.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)