मुंबई : हिंदू धर्मात, नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, या दिवसात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध विधी आणि उपाय करतात. (Navratri Upay) त्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या झोळी आनंदाने भरते. नवरात्रीमध्ये कलश मांडणे आणि अखंड ज्योत लावणे शुभ मानले जाते. जर तुम्हीही नवरात्रीला कलश स्थापित करून अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल आणि आता नवरात्रीनंतर ती कशी बंद करायची असा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवमीच्या दिवशी अखंड ज्योती संबंधी काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्ती होईल, मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय.
नवरात्रीच्या दिवसांत बहुतेक लोक अखंड ज्योत लावतात. अखंड ज्योत हे शुभ प्रतीक मानले जाते, लोकं त्यात जव, तांदूळ यांसारख्या धान्यांचाही समावेश करतात. यामुळे घरामध्ये लक्ष्मी तसेच अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो. आता तुम्ही विचार करत आहात की या धान्यांचे काय करावे? तुम्ही त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.
अखंड ज्योतीची वात उरली असेल तर दिवा स्वतः विझत नाही तोपर्यंत जाळू द्या. अखंड ज्योतीचा दिवा स्वतः विझवणे शुभ मानले जात नाही. यामुळे तुमची पूजा खंडित होऊ शकते.
चैत्र नवरात्रीला जर तुम्ही कलशाची स्थापना केली असेल तर तुम्ही कलशासोबत ठेवलेला तांदूळ मूर्तीसोबत विसर्जित करू शकता. याशिवाय तुम्ही ते झाडाजवळ ठेवू शकता किंवा नदीत प्रवाहित करू शकता. किंवा पक्ष्यांना खायला ठेऊ शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)