मुंबई : व्हिडीओ (Video) पहिल्यानंतर अनेकांनी जर्मन तरुणी (Jarman girl) काय म्हणाली ते सविस्तर लिहिण्याची (raghuvir khedkar tamasha) मागणी केली होती. मित्रांनो, ती इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली बोलत होती.
दुपारी एक वाजता एकजण म्हणाला चला खेडकरांची भेट घेऊन येऊ, तंबूत गेलो त्यावेळी रघुवीर खेडकर खुर्चीत बसले होते. बोलणं सुरु झालं, मला अधिकवेळ बोलायचं असल्यामुळे त्यांनी दुपारी तीन वाजता यायला सांगितलं. तसेच जर्मन देशातील एक मुलगी आमच्यासोबत आहे तिच्याशी सुद्धा गप्पा मारा अस सांगितलं.
दिलेल्या वेळेत काही मित्र आणि मी तिथं पोहोचलो. त्यावेळी खेडकर यांनी जर्मन तरुणीला आवाज दिला…ताई म्हणून…
ज्यावेळी ती तरुणी बाहेर आली, त्यावेळी इंग्रजी बोलायला सुरुवात केली. समोरून उत्तर मराठीमध्ये आल. समोर बसलेले डजनभर कार्यकर्ते एकदम शांत झाले. मराठीत उत्तर दिल्यामुळे मी शांत झालो. तेवढ्यात खेडकर म्हणाले त्यांना मराठी येत…
“प्रिन्स दी खानसा” अस त्या जर्मन तरुणीच नाव आहे. तमाशात काय करता असा प्रश्न विचारला ? ‘मी पीएचडी करायला आले आहे. तमाशा सोबत कधीपासून फिरताय ? तीन वर्षे झाली असं तिने उत्तर दिल, त्याचबरोबर मला संपूर्ण महाराष्ट्र माहित आहे.
“मी तमाशा नावाचं पुस्तक जर्मन भाषेत लिहिलं आहे. माझी जर्मनमध्ये स्वतःची नाटक कंपनी आहे. मला तुमचं गाव खूप आवडलं. मी खूप सारे फोटो काढले आहेत. तुमच्या गावात आल्यानंतर मला जर्मनंची आठवण झाली. मला महाराष्ट्रातील खरडा आणि भाकरी खूप आवडते.”
त्यानंतर खेडकरांनी एक जोरदार किस्सा सांगितला. तमाशात देवी होणारी तरुणी अचानक आजारी पडली. आता देवी कुणाला करायचं असा प्रश्न पडला. परंतु प्रिन्स ताईंनी मी करते असं सांगितलं आणि सगळं व्यवस्थित सुद्धा केलं.
आपले आवडते डायरेक्टर संतोष पवार यांची आणि खेडकर यांची जुनी दोस्ती आहे. खेडकर मला म्हणाले लावा फोन…लावला फोन… पवार म्हणाले बोलरे मया… रघुवीर खेडकरांना बोलायचं आहे तुमच्याशी, आजच्या दिवशी खूप मोठ्या माणसाशी बोलणं करून देतोयस ही खूप मोठी गोष्ट आहे असं पवार म्हणाले. दोघांचं बोलणं झालं….संतोष पवार म्हणाले..ममयत आल्यावर पहिला मला भेट…
महाराष्ट्राला पोट धरून हसवणाऱ्या खेडकरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. म्हणाले तुम्ही सध्या ज्या कॉमेडी मालिका पाहताय, ते सगळं आपलं पाहून केलं जातंय. त्याचबरोबर त्या कलाकारांनी मला सांगून कॉपी करावं
वर्षाच्या सुरुवातीला माझ्या गावात मला कलावंतांमधील माणस भेटली…