Vastu Tips : घराच्या या दिशेच्या भिंतीला मारा हिरवा रंग, मुलाच्या शिक्षणाशी संबंधीत अडचणी होतील दूर

| Updated on: Jun 20, 2024 | 11:53 AM

जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल, तर वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips For Study), अभ्यासाच्या खोलीतील वास्तू दोषांमुळेही असे होऊ शकते. वास्तूनुसार, अभ्यासाच्या खोलीत अभ्यासाशी संबंधित काही वास्तू दोष असल्यास, मुलाचे मन एकाग्र होऊ शकत नाही.

Vastu Tips : घराच्या या दिशेच्या भिंतीला मारा हिरवा रंग, मुलाच्या शिक्षणाशी संबंधीत अडचणी होतील दूर
Follow us on

मुंबई : प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या शिक्षणाची नेहमीच काळजी असते. मुलाला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी ते सर्व प्रकारचे प्रयत्न करत राहतात. जेणेकरून त्यांच्या मुलाला चांगले शिक्षण मिळून जीवनात यश मिळू शकेल. मात्र, अनेक पालक आपल्या पाल्याला अभ्यासात रस नसल्याची तक्रार करतात. घरी, ते अभ्यासासाठी उत्सुक नसतात आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल, तर वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips For Study), अभ्यासाच्या खोलीतील वास्तू दोषांमुळेही असे होऊ शकते. वास्तूनुसार, अभ्यासाच्या खोलीत अभ्यासाशी संबंधित काही वास्तू दोष असल्यास, मुलाचे मन एकाग्र होऊ शकत नाही, ज्यामुळे तो चांगले प्रदर्शन करू शकत नाही. वास्तुशास्त्रानुसार मुलाची अभ्यासाची खोली कशी असावी हे जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार अभ्यासाच्या खोलीत करा हे बदल

आज वास्तुशास्त्रामध्ये आपण पूर्व दिशेला हिरव्या रंगाने मिळणाऱ्या शुभ फलांबद्दल जाणून  घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार हिरवा रंग पूर्व दिशेला मारणे चांगले मानले जाते. या दिशेला हिरवा रंग मारल्याने मुलांच्या जीवनाची गती कायम राहते. त्याच्या प्रगतीच्या मार्गात कोणतीही अडचण येत नाही. पूर्वेकडे तोंड करून वाचन केल्यास वाचकाला खूप फायदा होतो. त्यामुळे त्याची बौद्धिक क्षमता सुधारते आणि तो परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतो.

यासोबतच पूर्व दिशा लाकडाच्या घटकाशी देखील संबंधित आहे. त्यामुळे पूर्व दिशेला हिरव्या रंगासोबत लाकडापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्या तर ते अधिक शुभ आणि फलदायी असते. खोलीचे दरवाजे किंवा खिडक्या या दिशेने बनवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

वास्तूनुसार पश्चिम दिशेला पांढरा रंग मारल्याने किंवा पांढर्‍या रंगाच्या वस्तू ठेवल्याने पश्चिम दिशेशी संबंधित घटकांचे चांगले परिणाम होतात. पश्चिम दिशा घरातील लहान मुलांशी संबंधित आहे. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या खोलीच्या पश्चिम दिशेला धातूचे किंवा पांढर्‍या रंगाचे काहीतरी ठेवले तर त्यांच्या आनंदात नक्कीच वाढ होईल. यासोबतच घरातील वातावरणही चांगले राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)