मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. त्या गोचर कालावधीनुसार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आता 30 मे 2023 रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागतात. शुक्र गोचरामुळे कारको भव नाशयथि अशी स्थिती तयार होत आहे. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा असा की ग्रह एका विशेष स्थित राहून चांगली फळं देत नाही. असंच काहीसं शुक्र ग्रहाबाबत आहे. शुक्राच्या गोचरामुळे दोन राशीच्या जातकांना सावध राहावं लागणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, 30 मे रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत 6 जुलैपर्यंत राहील. त्यानंतर 7 जुलैला पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल.
कर्क : या राशीच्या प्रथम भावात शुक्र गोचर करणार आहे. पण या राशीच्या चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी शुक्र आहे. यामुळे निश्चितचं कर्क राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. पण प्रथम स्थानात बसून शुक्र सातव्या स्थानाकडे पाहात आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. शुक्र गोचरामुळे वैवाहित जीवनात चढ उतार पाहायला मिळतील. त्यामुळे ही स्थिती हातळण्यासाठी सज्ज राहा. जोडीदारासोबत कोणताही वाद झाला तरी सामंजस्यपणे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार दूर करा आणि चर्चेने प्रश्न सोडवा.
मकर : या राशीच्या पाचव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. पण कर्क राशीत गोचर करताच सातव्या स्थानात स्थित असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांनाही वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. विनाकारण वाद होईल असं वागू नका. पती किंवा पत्नीसोबत एखादा वाद झाल्यास तो टोकाला जाईल असं अजिबात करू नका. ग्रहांची साथ नसल्याने मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या काळात काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)