Sadesati : शनिच्या साडेसातीमुळे जीवनात करावा लागतो समस्यांचा सामना, हे उपाय ठरतील प्रभावी

| Updated on: Aug 25, 2023 | 6:34 PM

Sadesati जेव्हा शनि कोणत्याही राशीच्या बाराव्या भावात किंवा त्या राशीच्या दुसऱ्या भावात असतो तेव्हा त्या राशीसाठी साडेसाती चालू होते. अशाप्रकारे शनि एका राशीवर सलग तीन वेळा प्रभाव टाकतो.

Sadesati : शनिच्या साडेसातीमुळे जीवनात करावा लागतो समस्यांचा सामना, हे उपाय ठरतील प्रभावी
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई :  साडेसाती (Sadesati) आणि अडिचकीमध्ये शनि प्रत्येक राशीवर प्रभाव टाकतो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहते. जेव्हा कोणत्याही राशीवर शनीच्या विशेष स्थितीमुळे हा प्रभाव पडतो तेव्हा त्याला शनिची साडेसाती म्हणतात. जेव्हा शनि कोणत्याही राशीच्या बाराव्या भावात किंवा त्या राशीच्या दुसऱ्या भावात असतो तेव्हा त्या राशीसाठी साडेसाती चालू होते. अशाप्रकारे शनि एका राशीवर सलग तीन वेळा प्रभाव टाकतो. साडेसातीमध्ये अडीच वर्षांचा तीन टप्पा असा साडेसात वर्षांचा असतो.

असा होतो साडेसातीचा परिणाम

साडेसातीच्या उत्तरार्धात शनि शुभ फळ देतो. करिअरमध्ये यश मिळते. व्यक्तीला पैसे आणि उच्च पद लाभते.  परदेशातून लाभ होण्याची आणि परदेश प्रवासाची शक्यता असते. साडेसातीच्या पुर्वार्धात अशुभ फळ मिळतात. अनेकांसाठी नोकरीत समस्या निर्माण होतात. आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. कधी अपघात आणि अपयशाची परिस्थिती येते.साडेसातीचा मानसिक स्थितीवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम होतो.

साडेसातीत हे उपाय करा

  • रोज सकाळ संध्याकाळ शनी मंत्र “ओम शं शनैश्चराय नमः” चा जप करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
  • त्याठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करा. जेवणात मोहरीचे तेल, काळे हरभरे आणि गूळ वापरा. तसेच आपले वर्तन व आचरण चांगले ठेवा.
  • याशिवाय डाव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. जेव्हा साडेसातीचा प्रकोप वाढतो तेव्हा शनिवारी संध्याकाळी दशरथाने रचलेल्या शनि स्तोत्राचे पठण करावे.

अशा प्रकारे करा शनिदेवाची पूजा

शनिवारी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा केल्यास विशेष लाभ होतो. काळ्या किंवा निळ्या आसनावर बसून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. पश्चिम दिशेला तोंड करून प्राणायाम करा. आता शनिस्तोत्राचा सात वेळा सतत पाठ करा, हे सकाळ-संध्याकाळ 27 दिवस सतत करा. तुमच्या समस्येसाठी शनिदेवाची प्रार्थना करा.

हे सुद्धा वाचा

शनीची पूजा करताना काळजी घ्या

शनिदेवाची पूजा नेहमी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर करावी. नेहमी स्वच्छ वस्त्र परिधान करून स्नान करून शनिदेवाची पूजा करावी. शनिदेवाच्या पूजेमध्ये नेहमी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरावे. शनिदेवाची पूजा नेहमी शांत चित्ताने करा. पूजेमध्ये काळ्या किंवा निळ्या रंगाचे आसन वापरावे. पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवाची पूजा करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)