मुंबई : ज्योतिषशास्त्रात गुरुची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. ज्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत असते त्या जाताकांना प्रत्येक क्षेत्रात चांगलं बळ मिळतं. गुरु हा ग्रह ऐश्वर्य़, वैभव, आध्यात्म, समृद्धी आणि शिक्षेचा कारक आहे. त्यामुळे गुरुची स्थितीत जराही बदल झाला तर राशीचक्रावर परिणाम दिसून येत आहे. गुरुच्या स्थिती 4 सप्टेंबरपासून बदलणार आहे. अर्थात गुरु मेष राशीतच असणार असून वक्री होणार आहे. गुरु ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे काही राशीच्या जातकांना लाभ, तर काहींना त्रास होणार आहे.दुसरीकडे गुरु आणि राहुची युती असल्याने चांडाळ योग कायम राहणार आहे. मात्र त्याचा प्रभाव काही अंशी कमी होईल असं काही ज्योतिष्यांचं म्हणणं आहे. राशीचक्रातील तीन राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होणार ते…
कर्क : या राशीच्या कर्मभावात गुरु ग्रह वक्री अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी किंवा करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण दिसून येईल. तसेच जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. बेरोजगार असलेल्या तरुणांना नोकरी मिळू शकते. व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवण्याची संधी आहे. या कालावधीत बचतही करू शकता. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते.
सिंह : या राशीच्या नवव्या स्थानात गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. या कालावधीत एखादा नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच चांगला पैसा हातात खेळता राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना अपेक्षित यश मिळू शकते. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कानावर पडू शकते. त्यांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. जे लोकं रिसर्च क्षेत्राशी निगडीत काम करताना त्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन : गुरु ग्रह या राशीच्या धन स्थानात वक्री होणार आहे. त्यामुळे अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या कालावधीत मिळू शकतो. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत निर्माण होतील. आत्मविश्वास दुणावलेला राहील आणि हाती घेतलेली कामं पूर्ण कराल. कौटुंबिक स्तरावर तुम्हाला चांगली मदत होईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)