Shani Vakri 2023 : 29 ऑगस्टपासून शनि वक्री अवस्थेत होणार अधिक बलवान, चार राशींना मिळणार उर्जा

| Updated on: Aug 28, 2023 | 6:13 PM

Shani Vakri 2023 : शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे शनिची स्थिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. या स्थितीची चार राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

Shani Vakri 2023 : 29 ऑगस्टपासून शनि वक्री अवस्थेत होणार अधिक बलवान, चार राशींना मिळणार उर्जा
Shani Vakri 2023 : शनि वक्री अवस्थेत असताना 29 ऑगस्टपासून मिळणार आणखी बुस्टर, चार राशींवर असेल कृपा
Follow us on

मुंबई : शनि या ग्रहाबाबत ऐकलं की भल्याभल्यांच्या पायाखालची जमिन सरकून जाते. कारण शनिची अवकृपा झाली की राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे शनिची स्थिती आणि आपला स्वभाव यात खडा पडला की वाईट दिवस येण्यास वेळ लागत नाही. शनिदेवांना वय, दु:ख, आजार, लोह, खनिज तेल, तुरुंग यांचा कारक मानलं जातं. त्यामुळे शनिची स्थिती बदलली की दिग्गजांनाही तुरुंगवारी करावी लागते, असं म्हंटलं जातं. शनिदेव 17 जूनपासून स्वरास असलेल्या कुंभ राशीत वक्री झाले आहेत. तर 29 ऑगस्टपासून या स्थितीत असताना आणखी बळ मिळणार आहे. त्यामुळे चार राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..

या चार राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या कर्मस्थानात अडीच वर्षांसाठी शनि विराजमान आहे. त्याचबरोबर भाग्येश असून कारक स्थान आहे. त्यामुळे या कालावधीत उदयोग धंद्यात अपेक्षित यश मिळू शकते. तसेच धनप्राप्ती झाल्याने काही कामं मार्गी लागतील. काही इच्छा झटपट पूर्ण झाल्याने आनंद व्हाल. या कालावधीत काही कामं पूर्ण करण्याचा सपाटा लावा. वाणीवर नियंत्रण ठेवा आणि कोणी आपल्या बोलण्याने दुखावणार नाही याची काळजी घ्या.

मिथुन : या राशीच्या भाग्यस्थानात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे. शनिदेव ज्या पद्धतीने घेतात. त्याच वेगाने देऊन जातात अशी स्थिती आहे. 29 ऑगस्टनंतर मोठं यश तुमच्या पदरात पडू शकते. काही सुप्त इच्छा पूर्ण होतील. तसेच केतु आणि शनिचा नवपंचम योगही संपुष्टात येणार आहे. वडिलांसोबत संबंध चांगले राहतील.

तूळ : या राशीच्या जातकांची नुकतीच शनिच्या अडचकीतून मुक्तता झाली आहे. त्यामुळे शनिची स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. शनि या राशीच्या पंचम स्थाना आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. तसेच जुनाट आजारातून दिलासा मिळू शकतो. एखाद्या स्रोताकडून अचानक धनलाभ होऊ शकतो.

मकर : शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा या राशीसाठी सुरु आहे. त्यामुळे शनि वक्री स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. तसेच केलेल्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना नव्या जॉबची संधी मिळू शकते. या कालावधीत कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. जबाबदारीमुळे मानसन्मानही वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)