मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा राशीचक्रावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची स्थिती ठरते. ग्रहमंडळात ग्रह ठराविक कालावधीनंतर जागा बदलत असतात. त्याचा थेट प्रभाव राशीचक्रावर होतो आणि अर्थात त्या त्या राशीच्या लोकांना परिणाम भोगावे लागतील. सूर्य आणि शनि यांच्यात पिता पूत्रांचं नातं आहे. असं असलं तरी दोघं एकमेकांचे शत्रू ग्रह असल्याचं मानलं जातं. सध्या शनि हा स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहे. दुसरीकडे सूर्य स्वरास असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे. दोन्ही ग्रह स्वराशीत असताना एकमेकांपासून सातव्या स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे समसप्तक योग तयार झाला आहे. यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तीन राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येईल.
मिथुन : या राशीच्या जातकांना शनि आणि सूर्याची स्थिती फलदायी ठरणार आहे. सूर्यामुळे आत्मविश्वास वाढेल. शनिमुळे काही चुका सुधारण्याची वेळ येईल. वडिलांसोबत असलेले विळ्याभोपळ्याचं नातं या काळात संपुष्टात येईल. वडिलांकडून चांगला पाठिंबा मिळेल. तसेच वडिलोपार्जित संपत्तीची माहिती मिळेल. त्यामुळे आपल्यासाठी वडिलांनी काय केलं याची अनुभूती मिळेल. 29 ऑगस्टला शनि ग्रह प्रबळ होणार असल्याने काही इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये काही नवीन संधी चालून येतील.
तूळ : शनिच्या अडीचकीतून सुटका झाल्यानंतरही तळ्यातमळ्यात अशी स्थिती सुरु आहे. पण आता ग्रहांची स्थिती अनुकूल होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही. जे काही मिळेल ते सहज मिळलं असं समजू नका. खासकरून आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसेल. शनिदेवांची कृपा मिळेल. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं न्यायालयीन प्रकरण संपुष्टात येईल.
मेष : प्रथम स्थानात गुरु आणि राहुची युती असल्याने डोकेदुखी वाढली आहे. पण सूर्य आणि शनिची समसप्तक स्थिती फलदायी ठरणार आहे. यामुळे आत्मविश्वासात काही अंशी वाढ होईल. नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील. काही गुंतवणुकीतून फायदा होईल पण अपेक्षित लाभ मिळणार नाही. शेअर बाजारात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट फलदायी ठरेल. पण तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. सूर्याच्या स्थिती मुलांच्या प्रगतीत वृद्धी दर्शवत आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)