Astrology : 24 सप्टेंबरला मंगळाचा होणार अस्त, या राशीच्या लोकांना नोकरीत दिसेल प्रभाव

| Updated on: Aug 25, 2023 | 4:23 PM

Astrology कन्या राशीत मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन झाल्याने ऊर्जा आणि चिकाटीची कमतरता होऊ शकते. दुसरीकडे, काही लोकांसाठी तो शुभ काळ आणू शकतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो.

Astrology : 24 सप्टेंबरला मंगळाचा होणार अस्त, या राशीच्या लोकांना नोकरीत दिसेल प्रभाव
जोतिषशास्त्र
Follow us on

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), प्रत्येक राशीच्या लोकांवर ग्रहांच्या बदलाचा परिणाम होतो. हिंदू पंचांग नुसार, मंगळ सध्या कन्या राशीत विराजमान आहे आणि 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06.26 वाजता कन्या राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत या 3 राशीच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो. कन्या राशीत मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन झाल्याने ऊर्जा आणि चिकाटीची कमतरता होऊ शकते. दुसरीकडे, काही लोकांसाठी तो शुभ काळ आणू शकतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो. मेष राशीच्या सहाव्या घरात मंगळाचा अस्त होत आहे. अशा परिस्थितीत या लोकांना आरोग्य आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. मंगळाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

या राशीच्या लोकांवर होणार सर्वाधीक प्रभाव

वृषभ

वृषभ राशीच्या पाचव्या घरात मंगळाचा अस्त होत आहे. आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. शेवटी कठोर परिश्रम फळ देऊ शकतात. आर्थिक स्थितीही सुधारेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कन्या

कन्या राशीच्या पहिल्या घरात मंगळाचा अस्त होत आहे. या लोकांना त्यांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. मंगळाच्या अस्तामुळे नोकरदारांना त्रास होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थितीबाबत सावध राहाणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

हे सुद्धा वाचा

धनु

या राशीच्या चौथ्या घरात मंगळाचा अस्त होणार आहे. या राशीच्या व्यावसायीकांना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विवाह इच्छुकांचे लग्न जुळण्याचे योग आहेत. नोकरीत केलेले बदल लाभदायक ठरणार आहे. लांबच्या प्रवासातून फायदा होण्याचे योग आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)