देशात भाजपला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात किती खासदार निवडून येणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा काय? पाहा…

| Updated on: Aug 24, 2023 | 3:57 PM

Chandrashekhar Bawankule on Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद, बच्चू कडू यांचे दावे अन् कांदा लिलाव यावर काय म्हणाले? देशात भाजपला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात किती खासदार निवडून येणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा काय? पाहा...

देशात भाजपला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात किती खासदार निवडून येणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा काय? पाहा...
Follow us on

यवतमाळ | 24 ऑगस्ट 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या यवतमाळमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राज्याचे मुख्यमंत्री बदलणार आहेत, असा दावा विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केला. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असं बावनकुळे यांनी अधोरेखित केलं आहे. शिवाय आज सकाळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सत्ता आणि जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुख्यमंत्री बदलण्याच्या केल्या जाणाऱ्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार जे बोलतात ते या महाराष्ट्राला संभ्रमात टाकण्याचं करण्याचं काम करत आहेत. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने, देवेंद्र फडणवीस आणि मी सुद्धा वारंवार सांगितलं आहे की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे निश्चिंत राहावं. वडेट्टीवार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राला संभ्रमात ठेवण्याचं ते काम करत आहेत. पण जनतेला सारं माहिती आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत या आघाडीचा लोगो प्रदर्शित होणार आहे. त्यावर काहीही केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणतीही आघाडी उघडली. तरीही 51 टक्के मत घेऊन नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील. आमची महायुती मोदीजीच्या नेतृत्वाखाली 45 हून अधिक जागा महाराष्ट्रात जिंकेल. तोच आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे, असंही बावनकुळे म्हणालेत.

पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस , भारती पवार लक्ष ठेऊन आहेत. मला वाटत कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. यवतमाळ, वाशीम लोकसभा मतदारसंघाविषयी बोलताना ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंना शिवसेनेला ती जागा असेल त्या ठिकाणी भाजप पूर्ण ताकद लावेल. जास्त ताकद लावेल अजित दादासाठी ही ताकद भाजप लावेल. त्यांची ताकद आम्हाला मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचं म्हटलं. शिवाय 10 – 11 उमेदवार निवडून येतील, असंही दावा त्यांनी केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला उत्तर दिलं आहे. बच्चू कडू यांचं ते मत आहे. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. जेव्हा निवडणुका होतील. निकाल येतील तेव्हा बघू … बच्चू कडू अत्यंत चांगला कार्यकर्ता तो एनडीएसोबतच आहे आणि पुढेही राहील, असं बावनकुळे म्हणालेत.