पुणे : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जामीन (Sanjay Raut Bail) मिळाल्यानंतर टायगर इज बॅक अशा आशयाचं ट्वीट केलं. दरम्यान, टीव्ही 9 मराठीसोबत संवाद साधत असताना सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यामुळे आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवाय संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांना गहिवरुन आलं होतं. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.
संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. दरम्यान, अखेर 102 दिवसांच्या न्यायालयनी कोठडीनंतर संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज निकाल आला. याआधी या जामीन अर्जावरील दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर अखेर आज सुप्रीम कोर्टानं संजय राऊत यांनी जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.
Tiger is back… !!!! @AUThackeray @SaamanaOnline
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 9, 2022
पत्राचाळ आर्थिक व्यवहारात संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप ईडीने केला होता. या आरोपांखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, संजय राऊत यांना करण्यात आलेली अटक राजकीय हेतूने करण्यात आली असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता. ईडी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर दबाव टाकण्यासाठी केला जात असल्याचा आरोप खुद्द संजय राऊत यांनीही केला होता. तसं पत्रंही त्यांनी लिलिहलं होतं.
अखेर आता संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटात पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. संजय राऊत आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींवर भाष्य करताना नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.