संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणूक लढवणार नाहीत! संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील 4 मोठे मुद्दे

| Updated on: May 27, 2022 | 11:51 AM

SambhajiRaje Chatrapati News : मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही आहे, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला खडसावलं आहे.

संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणूक लढवणार नाहीत! संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील 4 मोठे मुद्दे
पत्रकार परिषदेतील मोठे मुद्दे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत, हे आता स्पष्ट जालंय. मुंबईत त्यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. सोबत त्यांंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. संभाजी राजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. जाणून घेऊयात संभाजी राजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेतील चार मोठे मुद्दे :

पाहा व्हिडीओ :

4 मोठे मुद्दे :

  1. राज्यसभा निवडणूक लढवणार नाही – राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा हा निर्णय घेतला असल्याचं संभारीज राजे यांनी म्हटलंय. मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही आहे, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला खडसावलं आहे. माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको आहे, असंही ते म्हणालेत. तसंच सर्वपक्षीयांची मदत मला अपेक्षित होती, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
  2. शिवसेनेची ऑफर होती – अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर मला शिवसेनेकडून ऑफर आली होती. पण ही ऑफर मी नाकारली. शिवसेनेने मला पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करावं, असा प्रस्ताव मी दिला होता. त्यावर चर्चा झाली. बैठका झाल्या. हा प्रस्ताव पुढे सरकत असतानाच मध्येच संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या बातम्यांनी मीही हादरलो. मलाही दुःख झालं, असं संभाजी राजे यांनी म्हटलंय.
  3. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली. पण मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही. ज्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांसोबत माझ्या बैठका झाल्या, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, असंही संभाजी राजे छत्रपतींनी म्हटलंय. मुख्मयंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
  4. आता पुढची दिशा स्वराज्य बांधणीची – राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली पुढची राजकीय दिशा काय असणार आहे, यावरही भाष्य केलंय. संभाजीराजे यापुढे राज्याचा दौरा करुन महाराष्ट्रभरातील मावळ्यांची बांधणी करणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. शिवाय संभाजीराजेंच्या खासदारीसाठी त्यांना अनेक अपक्ष आमदारांचे फोनही आहे. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, पण आमच्यावर दबाव आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राजकीय पक्षांचे अजेंडे आणि माझे अजेंडे वेगळे असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी म्हटलंय.