मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर ह्ललाबोल केला. यांनतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील या निर्णयामुळे चिडले आहेत. थेट ट्विट करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
— Raj Thackeray (@RajThackeray) September 13, 2022
हा प्रकार गंभीर आहे.महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.
— Raj Thackeray (@RajThackeray) September 13, 2022
वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टर अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे सांगितले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत गुजरातमध्ये या प्रकल्पाचे स्वागत केले आहे.
ही कंपनी 95 टक्के राज्यात येणार होती. पण अचानक ती गुजरातला गेली आहे. हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.