पुणेः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 (Pimpri Chinchwad Municipal Corporation Ward no. 26) मध्ये जे चार नगरसेवक निवडून आले आहेत, ते सर्व नगरसेवक हे भाजपकडून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच (BJP) बाजी मारणार की, राष्ट्रवादी (NCP) वेगळी रणनिती आखणार हे निडणुकीतच स्पष्ट होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या परीने चाचपणी सुरू केली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असल्याने अनेक राजकीय पक्षांनी या मनपा निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार असले तरी राष्ट्रवादीसह भाजपने जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राजकीय पक्ष लक्ष ठेवून असणार आहेत.
गेल्या निवडणुकी भाजपने बाजी मारली असल्याने यावेळीही त्यासाठी भाजप जोरदार तयारी करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 आता कोणाची सत्ता असणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
राष्ट्रवादी | ||
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची ज्या प्रमाणे जोरदार चर्चा असते त्याच प्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच आरक्षणांची जोरदार चर्चा होत असते. कारण आगामी निवडणुकीत कोणता प्रभाग आरक्षित झाला आहे आणि कोणता प्रभाग पारंपरिक राहिला आहे हे राजकीय नेत्यांसह राजकीय पक्षांनाही महत्वाचे असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना राजकीय धक्के बसले आहेत. कारण प्रभाग क्र. 26 मध्ये सर्वसाधारण महिला , आणि दोन सर्वसाधारण गटासाठी प्रभाग जाहीर झाला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्या जागेसाठी जोरदार चुरस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
राष्ट्रवादी | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष |
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये बिजलीनगर, दळवी नगर, भुईर नगर, इंदिरानगर, चिंचवडे नगर हा परिसर येतो. यामध्ये उत्तर भागात आकुर्डी चिखली स्पाईन रोड पासून पूर्वेस बिजलीनगर रस्त्याने होऊन चौक बिजलीनगर पर्यंत व ओम चौकातून उत्तरेस अश्विनी हॉस्पिटल नगरच्या रस्त्याने रेल्वे लाईन पर्यंत व तिथून पूर्वेकडे रेल्वे लाईनने काही सोपानराव भोईर रेल्वे पुलापर्यंत आहे. पूर्व भागात काही सोपानराव भोईर रेल्वे पुलापासून दक्षिणेस दळवीनगर चिंचवड रस्त्याने नक्षत्र सोसायटी व साई कॅपेपर्यंत व तिथून प्रेमलोग पार्क रस्त्याने पश्चिमेस बिजलीनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या छत्रपती शिवाजी चौकापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस चिंचवडेनगरकडे जाणाऱ्या चिंचवडे नगर वाल्हेकर वाडी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने वाल्हेकर वाडी रस्त्याने पद्मजा हॉस्पिटलपर्यंत व तिथून पूर्वेस फत्तेचंद जैन कॉलेज लगतच्या सीमा भिंतीने चिंचवड जुना जकात नाक्यापर्यंत व तिथून दक्षिणेस डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पवना नदीच्या थेरगाव चिंचवड फुलापर्यंत आहे दक्षिण बाजूला पवना नदी आहे तर पश्चिमेला कीजुदेवी बोट क्लब पवना नदीपासून उत्तरेस पंपिंग स्टेशन पासून हॉटेल वाघेरे रानमाळ्यापासून नाल्याने वाल्हेकर वाडी रस्त्यापर्यंत व तोच रस्ता ओलांडून आकुर्डी चिखली स्पाईन रस्त्यापर्यंत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |