देशातलं वातावरण बदलतंय, 2024 ला ‘जायेगा तो मोदी ही’ याच घोषणा!; संजय राऊत यांचं लोकसभा निवडणुकीवर भाष्य

| Updated on: Sep 13, 2023 | 12:55 PM

Sanjay Raut on Loksabha Election 2024 ; देशातलं वातावरण बदलत आहे. 2024 ला आयेगा तो मोदी नाह, तर जायेगा तो मोदीच्याच घोषणा असतील. 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप देशात हल्ला घडवण्याची भीती; संजय राऊत यांचं मोठं विधान, वाचा...

देशातलं वातावरण बदलतंय, 2024 ला जायेगा तो मोदी ही याच घोषणा!; संजय राऊत यांचं लोकसभा निवडणुकीवर भाष्य
Follow us on

मुंबई| 29 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. अशात विविध दावे-प्रतिदावे तसंच घोषणा केली जात आहे. माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे. आम्हाला भीती वाटते. जसं गोधरा हत्याकांड केलं, असं म्हणतात. त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून ट्रेन बोलवतील आणि त्या एखाद्या ट्रेनवर हल्ला करतील. त्याच्या आगीचा डोंब उसळणार तर नाही ना अशी भीती वाटतेय.जसं पुलवामा घडू शकत त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल असे देशातील प्रमुख विरोधी पक्षाने भीती वाटत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

येत्या 2024 आयेगा तो मोदी नाही. तर जायेगा तो मोदी आशा घोषणा असतील. लोकसभेमध्ये आमचा 19 चा आकडा आहे. तो कायम राहील. उलट आणखी जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.  भाजपकडे 2024 च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही. या देशात बेरोजगारी महागाई आहे. चीनने घुसखोरी केलेली आहे. अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्याकडे लक्ष न देता धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं. हा एकच अजेंडा भाजपकडे आहे, असंही राऊत म्हणालेत.

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. याबैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय.या बैठकीला देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहतील. यात देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पण या बैठकीत जागा वाटपाची चर्चा या बैठकीत होणार नाही. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

इंडियाला कोणी काउंटर करू शकत नाही. आमची घोडदौड रोखणं कोणाला शक्य नाही. कोणी कितीही आडव्या या… कुणी काहीही करू शकणार नाही. येत्या निवडणुकीत इंडियाच जिंकेल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी एक महत्त्वाचे नेते आहेत. कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांचंच काम सध्या देशभरात दिसत आहे. भविष्यातील ते देशाचे नेतृत्व आहेत, असंही राऊतांनी म्हटलं.