पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया (election process) राबविण्यात येत असल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्याचे राज्य सरकार विनाकारण या निर्णयाला सामोरे जात आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करून त्यास विलंब करणे. “पीएमसीमध्ये निवडून आलेली संस्था नसल्यामुळे नागरिकांना आधीच त्रास सहन करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकाचा कार्यकाळ आणखी वाढवण्यास आक्षेप घेतला होता आणि 15 दिवसांत निवडणूक जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. सध्याच्या निर्णयामुळे निवडणुकीला आणखी विलंब होईल आणि नागरिकांच्या त्रासात भर पडेल, असे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले होते. मागच्या पाच वर्षात तिथं भाजपच्या नगसेवकांची सत्ता होती.
प्रसन्न घनश्याम जगताप – भाजप
ज्योती किशोर गोसावी – भाजप
मंजुषा दीपक नागपुरे – भाजप
श्रीकांत शशिकांत जगताप – भाजप
व्याप्ती – अतुलनगर, खडकवासला, आदित्य गार्डन सिटी, न्यू कोपरे, रेणुकानगर, माई मंगेशकर रुग्णालय, वारजे पार्क, सिद्धिविनायक कॉलनी, भैरवनाथनगर, नक्षत्र सोसा., शिवणे इ.
लोकसंख्या – 64919
34 अ – सर्वसाधारण महिला
34 ब – सर्वसाधारण
34 क – सर्वसाधारण
उत्तर : मौजे कोंढवे धावडे व मौजे भूगाव यांची हद्द (indus international | school जवळ) एकमेकास जेथे मिळते तेथून उत्तरेस व पुढे पूर्वस सदर हद्दीने व पुढे पूर्वेस मौजे बावधन बुद्रुक व मौजे शिवणे यांच्या हद्दीने व पुढे उत्तर पूर्वेस मौजे वारजे व मौजे बावधन खुर्द यांचे हद्दीने मौजे कोथरूड व मौजे वारजे यांचे हद्दीस मिळेपर्यंत.
पुर्व : मौजे वारजे व मौजे बावधन खुर्द यांची हद्द मौजे कोथरूड व मौजे वारजे यांचे हद्दीस जेथे मिळते तेथून दक्षिण पूर्वेस मौजे वारजे व मौजे कोथरूड यांचे हद्दीने वारजे मधील श्रीराम अपार्टमेंट आणि विघ्नहर सोसायटीच्या पश्चिमेकडील रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रेषेने व पुढे रस्त्याने वारजे स. नं. १३२ श्रीनिवास लबडे पार्कच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने ईशान संस्कृतीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने ईशान संस्कृतीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने नादब्रम्ह सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस नादब्रम्ह सोसायटीच्या कॅनॉल रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस कॅनॉल रस्त्याने कात्रज देहूरोड बायपास रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस वारजे मधील कृष्णा पार्क सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने व पुढे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या पूर्वेकडील रस्त्याने एन.डी.ए. रस्त्यास मिळेपर्यंत,
दक्षिण : वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या पूर्वेकडील रस्ता एन.डी.ए. रस्त्यास जेथे मिळतो तेथून दक्षिण पश्चिमेस एन.डी.ए. रस्त्याने व पुढे एन. डी. ए. च्या हद्दीने मौजे कोपरेच्या पुनर्वसित वसाहतीच्या हदीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस मौजे कोपरे व मौजे शिवणे उत्तमनगर यांच्या हद्दीने मुठा नदीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस मुठा नदीने खडकवासला धरणाजवळ मौजे कुडजेच्या पुणे मनपा हद्दीस मिळेपर्यंत
पश्चिम : मुठा नदी खडकवासला धरणाजवळ मौजे कुडजेच्या पुणे मनपा | हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस मोजे कुडजेच्या मनपा हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे कोंढवे धावडे व मौजे अहिरे यांच्या मनपा हद्दीने मौजे भूगावच्या हद्दीस मिळेपर्यंत
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
भाजप | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |