हे राज्य ठरले श्रीमंत आमदारांचे ‘राज्य’, डोळे पांढरे करतील इतकी आहे अफाट संपत्ती

| Updated on: May 19, 2023 | 4:10 PM

निवडणूक लागली की कोणत्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार किंवा नगरसेवक निवडून येतील याची उत्सुकता असते. मात्र, त्यापेक्षाही सर्वाधिक उत्कंठा असते ती आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची संपत्ती किती याची. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला की त्याच्या संपत्तीमध्ये...

हे राज्य ठरले श्रीमंत आमदारांचे राज्य, डोळे पांढरे करतील इतकी आहे अफाट संपत्ती
RICH MLA KARNATAK
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

कर्नाटक : निवडणूक लागली की कोणत्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार किंवा नगरसेवक निवडून येतील याची उत्सुकता असते. मात्र, त्यापेक्षाही सर्वाधिक उत्कंठा असते ती आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची संपत्ती किती याची. एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला की त्याच्या संपत्तीमध्ये वाढच होत असते. मात्र, देशातील ‘या’ राज्यातील आमदार असे आहेत की त्यांच्या संपत्तीचे आकडे हे देशातील अन्य राज्यातील आमदारांपेक्षा सर्वधिक आहे. हे राज्य आहे कर्नाटक. नुकतीच कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून विजयी उमेदवाराची संपत्ती जाहीर झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 आमदारांपैकी 217 आमदारांकडे कोटीच्या कोटी रुपयांची संपत्ती आहे.

कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झाला. भाजपचा दणदणीत प्रभाव करून काँग्रेसने राज्याची सत्ता हस्तगत केली. 135 जागा जिंकून काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. भाजपला (66), जनता दल एस (19 ) आणि अपक्ष यांना 4 जागा मिळाल्या. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार आणि सिध्दारमैया यांच्यात स्पर्धा रंगली. यात दिल्ली हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी सिध्दरमैया यांच्या बाजुने कौल दिला. तर, डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. सिध्दरमैया मंत्रीमंडळाचा शपथविधी २० मे रोजी होत आहे.

हे सुद्धा वाचा

कनार्टकमधील नवनिर्वाचीत 224 आमदारांपैकी 217 आमदार असे आहेत की त्यांच्याकडे कोटीहुन अधिक संपत्ती आहे. यात काँग्रेसचे 132, भाजपचे 63 तर जेडीएसचे 18 आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या प्रत्येक आमदारांची सरासरी संपत्ती ही 67.51 कोटी आहे. तर, भाजप आमदार (44.36 कोटी), जेडीएस (46.01 कोटी), कल्याण राज्य प्रगती पक्ष (246.51 कोटी), सर्वोदय कर्नाटक पक्ष (40.15 कोटी) आणि अपक्ष आमदारांची 637.16 कोटी इतकी पक्षनिहाय सरासरी संपत्ती आहे.

सर्वाधिक श्रीमंत तीन आमदार

सर्वाधिक श्रीमंत आमदारांमध्ये भावी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा नंबर पहिला आहे. त्यांच्याकडे 1413 कोटी इतकी संपत्ती आहे. ती अन्य आमदारांपेक्षा सर्वात जास्त आहे. त्याखालोखाल 1,267 कोटींची संपत्ती असलेले गौरीबिदनूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार के. एच. पुट्टस्वामी गौड यांचा क्रमांक लागतो. तर आमदार प्रियांक कृष्ण यांच्याकडे 1,156 कोटी इतकी संपत्ती आहे.

180 आमदारांकडे 5 कोटीहून अधिक संपत्ती

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिंकून आलेल्या 180 आमदारांची संपत्ती ही 5 कोटीहून जास्त आहे. 31 जणांकडे 2 ते 5 कोटी तर 10 आमदारांकडे 50 लाख ते 2 कोटीपर्यंतची संपत्ती आहे.

केवळ २ आमदार लखपती

सुळ्या मतदारसंघाच्या आमदार भागिरथी मुरुळी यांच्याकडे सर्वधिक कमी म्हणजेच केवळ 28 लाख संपत्ती आहे. कृष्णराज विधानसभेचे आमदार टी. एस. श्रीवत्स यांच्याकडे 48 लाख आणि मुधोळचे काँग्रेस आमदार रामाप्पा तिम्मापूर यांच्याकडे 58 लाख इतकी संपत्ती आहे.

कोणत्या आमदारावर सर्वाधिक कर्ज?

नव्याने निवडून आलेले आमदार करोडपती असले तरी त्यांच्यावर कर्जही तितकेच आहे. 149 आमदारांवर एक कोटीहून अधिक कर्ज आहे. प्रियांक कृष्ण यांच्यावर 881 कोटी असून त्याखालोखाल डी. के. शिवकुमार (265 कोटी), भैरती सुरेश (114 कोटी) इतके कर्ज आहे. कर्नाटक इलेक्शन वॉच आणि एडीआर या संस्थेच्या अहवालातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.