सुरेंद्रकुमार अकुर्डे, अकोला | गुवाहटीच्या वाटेवर असताना सूरतहून परत फिरलेले ठाकरे गटाचे नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं आज अमरावतीत सुरु आहेत. नितीन देशमुख यांच्याविरोधात अँटी करप्शन ब्युरोकडून (ACB) चौकशी सुरु आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नितीन देशमुख यांना आज अमरावतीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. मागील तीन तासांपासून नितीन देशमुख यांची चौकशी सुरू आहेत. तर एसीबीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी सुरु आहे.
गेल्या तीन तासांपासून नितीन देशमुख यांची चौकशी सुरु असल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेकडो कार्यकर्ते सकाळपासून अमरावतीच्या विभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या धरून बसले आहेत. त्यांच्या हातात नितीन देशमुख यांचे बॅनर्स असून त्यावर झुकेंगा नही साला… असा मजकूर लिहिला आहे. दुपारच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टरबूज फोडून त्यावर गुलाल टाकून सरकारचा निषेध व्यक्त केला.
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार आहेत. आज १७ जानेवारी रोजी आमदार नितीन देशमुख यांना अमरावती येथे हजर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ते आज सकाळी १० वाजता अकोला जिल्ह्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीच्या दिशेने मोठं शक्तिप्रदर्शन करीत निघाले. मी तुरुंगात जाण्याच्या तयारीनेच निघालो असून दोन जोडी कपडे सोबत ठेवले आहेत, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.
त्यांच्यासोबत अकोल्यातून जवळपास ७०० कार्यकर्ते देशमुख यांच्यासोबत निघाले. अमरावतीत विभागीय कार्यालयाबाहेर पोहोचल्यावर नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती. तक्रारदाराची ऑडिओ क्लिप माझ्याजवळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान, तीन तास चौकशी झाल्यानंतर नितीन देशमुख बाहेर आले. त्यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली. नितीन देशमुख म्हणाले, ‘
भारतीय जनता पार्टी मराठी मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठी माणसांच्या व अँटी करप्शन च्या चौकशा लावत आहे. भारतीय जनता पक्षाचे तक्रार करते किरीट सोमय्या मोहित कंबोज रवी राणा नवनीत राणा हे चारही मराठी आहेत. या तक्रारकर्त्यांमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं षड्यंत्र असल्याचा आमदार देशमुख यांचा आरोप…