अकोला : 2104 च्या मोदीलाटेनंतर राज्यात होत असलेले बदल 2017 पर्यंत टिकून राहिले आहेत. त्यानंतर भाजपाने केवळ देशाच्या राजकारणातच नव्हे तर स्थानिक पातळीवरही वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्याच जोरावर 2017 च्या (Municipal Election) महापालिका निवडणुकीत (BJP Party) भाजपाला अकोल्यात यश मिळाले. आता गेल्या 5 वर्षात केवळ राज्यातीलच नाहीतर स्थानिक पातळीवरील राजकारणातही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे गतवेळी प्रभाग क्रमांक 18 मध्ये 2 नगससेवक भाजापाचे एक शिवसेनेचा तर एक कॉंग्रेसचा अशी स्थिती होती. मात्र, बदलत्या राजकीय स्थितीमुळे भाजपाची ताकद वाढणार की (MVA) महाविकास आघाडीला संधी मिळणार हे पहावे लागणार आहे. अकोला महापालिकेसाठी यंदा 30 प्रभागात निवडणुक होणार आहे. यंदाची निवडणुक ही प्रभागनिहाय होणार आहे. 30 प्रभागात रंग चढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट होते की शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन लढा उभा करतात का हे पहावे लागणार आहे.
अकोल्यातील लोकसंख्या 18 लाख 18 हजार 617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9 लाख 36 हजार 226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8 लाख 82 हजार 391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत 2017 च्या निवडणुकीनुसार भाजपची सत्ता आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने प्रत्येक प्रभाग हा महत्वाचा आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील मतदारांनी सर्वच प्रमुख पक्षांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रभागातील चार दोन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक तर प्रत्येकी एका ठिकाणी शिवसेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळाली होती. आता बदलत्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. मात्र, या प्रभागात शिवसेनेच्या सपना नवले, कॉंग्रेसचे फिरोज खान तर भाजपाचे अमोल गोगे आणि जयश्री दुबे यांची वर्णी लागली होती. भाजपाने मिळवलेले य़श यंदाही टिकून राहणार का हे पहावे लागणार आहे. महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळे सत्तांतर झाले नसले तरी भाजपाचे वजन निर्माण झाले आहे.
अद्यापही निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी राज्य निवडणुक आयागोच्या सूचनांवरुन प्रभागाची हद्द ही ठरवून घेण्यात आली आहे. या 18 नंबर प्रभागाची लोकसंख्या ही 16 हजार 844 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 2668 तर अमुसूचित जमातीचे 293 मतदार आहेत. त्यामुळे उमेदवराचे भवितव्य खुल्या गटाच्याच हातामध्ये आहे. प्रभाग हद्द आणि इतर प्रशासकीय कामे पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात निवडणुक कार्यक्रम समोर आलेला नाही. मात्र, इच्छूकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रभाग क्रमांक 18 मध्ये यंदा तीन वार्ड असणार आहे. त्यानुसार अ मध्ये अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आहे तर ब मध्ये सर्वसाधारण महिला याला आरक्षण राहणार आहे. क वार्डात सर्वसाधारणसाठी जागा खुली राहणार आहे. त्यामुळे सर्वतोपरी तयारी झाली असली तरी निवडणुक कार्यक्रम जाहीर होणे गरजेचे आहे.
अकोला महापालिका प्रभाग 18 ‘अ’
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
अकोला महापालिका प्रभाग 18 ‘ब’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
अकोला महापालिका प्रभाग 18 ‘क’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |