अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत अद्यापही निर्णय झाला नसला तरी (Municipal Administration) पालिका प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. निवडणुक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रभाग हद्द ठरवण्यात आली आहे तर इतर औपचारिकताही पूर्ण झाली आहे. अकोला महापालिकेसाठी यंदा 30 प्रभागात निवडणुक होणार आहे. महापालिकेवर (BJP Party) भाजपाची सत्ता असली तरी प्रभाग क्रमांक 17 चे 2017 चे चित्र हे वेगळे होते. कारण या प्रभागातील 4 ही वार्डामध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडुण आले होते. त्यानंतर यंदाच्या महापालिका निवडुक पूर्वीच राज्याचे (Politics) राजकारण हे ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात तर बदल झालाच आहे पण आता हा बदल ग्रामपंचायत स्थरापर्यंत जाणवू लागला आहे. त्याचाच परिणाम अकोला महापालिकेवर काय होणार हे पहावे लागणार आहे. शिवाय प्रभाग क्रमांक 17 वरचे शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार की नाही देखील पहावे लागणार आहे. यंदाची निवडणुक ही प्रभागनिहाय होणार आहे. 30 प्रभागात रंग चढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट होते की शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन लढा उभा करतात का हे पहावे लागणार आहे.
अकोल्यातील लोकसंख्या 18 लाख 18 हजार 617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9 लाख 36 हजार 226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8 लाख 82 हजार 391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत 2017 च्या निवडणुकीनुसार भाजपची सत्ता आहे.
अकोला महापालिकेवर भाजपाची सत्ता असली तरी प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांनी सेनेच्या उमेदवारांना पसंती दिली होती. त्यामुळे प्रभागातील चारही वार्डात शिवसेनेचे उमेदवार हे नगरसेवक झाले आहेत. आता बदलत्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. मात्र, या प्रभागात गजानन चौहान, प्रमिला गीते, अनिता मिश्रा, राजेश मिश्रा हे चारही विजयी उमेदवार हे शिवसेनेचे होते. त्यामुळे बदलत्या राजकीय स्थितीचा परिणाम थेट प्रभागात कितपर्यंत होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळे सत्तांतर झाले नसले तरी भाजपाचे वजन निर्माण झाले आहे.
निवडणुक आयागोच्या सूचनांवरुन प्रभागाची हद्द ही ठरवून घेण्यात आली आहे. गतवेळच्या निवडणुकीत या प्रभागावर शिवसेनेच्या चारही उमेदवाराला यश मिळाले होते.या 17 नंबर प्रभागाची लोकसंख्या ही 17 हजार 872 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 165 तर अमुसूचित जमातीचे 14 मतदार आहेत. त्यामुळे उमेदवराचे भवितव्य खुल्या गटाच्याच हातामध्ये आहे. प्रभाग हद्द आणि इतर प्रशासकीय कामे पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात निवडणुक कार्यक्रम समोर आलेला नाही असे असतानाही अनेकजण हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
प्रभागाच्या व्याप्तीवरही बऱ्याच बाबी अवलंबून आहे. हद्द निश्चित करतानाच त्याची व्याप्तीही समोर आली आहे, या 17 प्रभागामध्ये काला चबुतरा, मोहम्मद अली रोड, पिंजारी गल्ली, तानाजी पेठ, मोमीनपुरा, तेली पुरा, इराणी झोपडपट्टी, फत्ते चौक, खारी बावडी या परिसराचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 17 मध्ये यंदा तीन वार्ड असणार आहे. त्यानुसार अ मध्ये अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आहे तर ब मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग याला आरक्षण राहणार आहे. क वार्डात सर्वसाधारण महिलेसाठी हा वार्ड खुला राहणार आहे. त्यामुळे सर्वतोपरी तयारी झाली असली तरी निवडणुक कार्यक्रम जाहीर होणे गरजेचे आहे.
अकोला महापालिका प्रभाग 17 ‘अ’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
अकोला महापालिका प्रभाग 17 ‘ब’
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |
अकोला महापालिका प्रभाग 17 ‘क’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |