Ajit Pawar Nitin Gadkari Meet : अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला, अचानक भेटीने राजकीय चर्चांना उधाण

| Updated on: Apr 29, 2022 | 8:30 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. नितीन गडकरी यांच्या या भेटीमुळं राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Ajit Pawar Nitin Gadkari Meet : अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला, अचानक भेटीने राजकीय चर्चांना उधाण
अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला
Image Credit source: tv9
Follow us on

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. नितीन गडकरी यांच्या या भेटीमुळं राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नियोजित दौऱ्यात नसताना अचानक घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीत दडलंय काय? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. राज्यात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या आणि नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक सुरू आहे. तर तिकडे औरंगाबादेत मनसेच्या  सभेची जोरदार तयारी सुरू आहे. तर तिकडे पुण्यात राज ठाकरेंच्या सकाळच्या औरंगाबाद दौऱ्याची जोरदार यारी आहे. अशात नागपुरात अजित पवार गडकरींच्या भेटीला पोहोचल्याने सहाजिकच या भेटीची चर्चा होणार.

नियोजित दौऱ्यात नसताना अचानक भेट

नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील विकास कामांमळेही ही भेट सुरू असल्याचा कयास लावला जातो आहे. मात्र नियोजित दौरा नसताना ही भेट अचानक झाल्यानेही या भेटीबाबत, ही भेट कशासाठी असा सवाल विचारण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा जोरदार सामना सुरू आहे. त्यामुळेही या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि मनसेचा सुरात सूर सध्या चांगलाच मिसळत आहे. त्या अनुषंगानेही या भेटीकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे ही भेट अजून जास्त चर्चेत आली आहे.

वळसे-पाटीलही गडकरींच्या भेटीला

नितीन गडकरींच्या भेटीला एकटे अजित पवार नाही तर सोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही पोहोचले. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील तसेच महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते हे पोलीस इमारतीच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते.  तसेच नितीन गडकरी हेही नागपुरात होते. त्यामुळे या भेटीचा योग जुळला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात विविध मुद्द्यावरून जोरदार घमासान सुरू आहे. भाजप नेते सरकार पडण्याची रोज नवी तारीख देत आहेत.  मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्यक्तीमहत्व नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यांच्या कामाचा धडाकाही नेहमीच चर्चेत असतो. ही भेट विकास कामासाठीही असू शकते. मात्र या दोन्ही नेत्यांकडून भेटीबाबत अद्याप कोणताही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.