CWG 2022 : Mirabai chanu वेटलिफ्टर मीराबाई चानूची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु
मीराबाई चानूने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक आणि विश्वविक्रमही केला आहे
1 / 5
टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू या वेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
2 / 5
चानू 55 किलो वजनी गटात तिचे आव्हान सादर करणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी मीरबाई अमेरिकेत होती जिथे ती तिच्या तयारीला अंतिम रूप देत होती.
3 / 5
भारताचे मुख्य वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मीराबाई तिची तयारी पूर्ण करत आहे. त्यांच्या तयारीसाठी ते अमेरिकेतील सेंट लुईस येथे जवळपास महिनाभर राहिले, तिथे मीराबाईचे प्रशिक्षण सुरू होते.
4 / 5
माजी विश्वविजेत्या चानूची महिलांच्या 49 किलो गटातील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 207 किलो (88 किलो आणि 119 किलो) आहे, ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या-सर्वोत्तम प्रतिस्पर्धीपेक्षा 39 किलो अधिक आहे.
5 / 5
मीराबाई चानूने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक आणि विश्वविक्रमही केला आहे