Top 15 Cars : भारतात या गाड्यांना सर्वाधिक मागणी, यादीत कोणत्या कार आहेत? वाचा
गेल्या काही वर्षात ऑटो कंपन्यांनी आपली घट्ट मुळं भारतीय बाजारात रोवली आहेत. त्यापैकी मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. इतर कोणत्या गाड्यांना मागणी आहे, वाचा
1 / 12
मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. वेगन र ही सलग दोन वर्षे भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. आतापर्यंत वेगनअरचे भारतात 30 लाख युनिट्स विकले आहेत. गेल्या वर्षी 2 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री केली. लोकांच्या आवडीनुसार वेळोवेळी डिझाइनमध्ये बदल करणारी वेगनआर कमी किंमतीमुळे मध्यमवर्गीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
2 / 12
मारुती सुझुकी स्विफ्टचे 1.7 लाख कार गेल्या वर्षी विकल्या गेल्या. कमी बजेटची कार खरेदी करणाऱ्या भारतीयांची स्विफ्ट ही आवडती कार आहे.
3 / 12
मारुती सुझुकी बलेनोच्या 1.5 लाख युनिट्सची विक्री गेल्या वर्षी झाली. ही हॅचबॅक कार आपल्या नाविन्यपूर्ण डिझाइनसह गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना आकर्षित करत आहे.
4 / 12
Tata Nexon च्या 1.5 लाख युनिट्सची विक्री गेल्या वर्षी झाली. एसयुव्ही प्रेमींमध्ये Tata Nexon ही आवडती गाडी आहे. हे कारच्या विक्रीवरून अधोरेखित होते.
5 / 12
मारुती सुझुकी डिझायरच्या 1.4 लाख कारची विक्री गेल्या वर्षी झाली. सेडान कार असल्याने तिच्या लूक भारी आहे. एसयूव्ही कारच्या स्पर्धेतही डिझायरने आपली मागणी कायम ठेवली आहे हे विशेष.
6 / 12
मारुती सुझुकी अल्टोच्या 1.4 लाख कारची विक्री गेल्या वर्षी झाली. अत्यंत कमी किमतीत अल्टो मायलेजमध्ये उत्कृष्ट आहे.
7 / 12
ह्युंदाई क्रेटाच्या 1.3 लाख कार युनिट्सची विक्री गेल्या वर्षी झाली. ही गाडी लाँच झाल्यापासून लोकप्रिय आहे. या गाडीने ह्युंदाई i20 लाही मागे टाकले आहे.
8 / 12
मारुती सुझुकी एर्टिगाच्या 1.15 लाख कार गेल्या वर्षी विकल्या गेल्या. गाडीचे पॉवरफुल इंजिन, केबिनची जागा इत्यादी लोकांचे लक्ष वेधून घेते.
9 / 12
मारुती विटारा ब्रेझाच्या 1.15 लाख युनिट्सची विक्री गेल्या वर्षी झाली.
10 / 12
टाटा पंच या गाडीची 2022 मध्ये 1.15 लाख युनिट्सची विक्री झाली. टाटा पंच लाँच झाल्याच्या एका वर्षात बेस्ट सेलर यादीत प्रवेश केला. एसयुव्हीसारखा लुक आणि स्वस्त किंमत यामुळे टाटा पंच कारची मागणी वाढली आहे.
11 / 12
मारुती सुझुकी इकोच्या 1 लाख कार गेल्या वर्षी विकल्या गेल्या. वाहतूक क्षेत्रातील ही एक अतिशय लोकप्रिय कार आहे. मायलेज सुपर आहे. त्यामुळे वर्षाला लाखो गाड्या विकल्या जातात.
12 / 12
Hyundai i10 Nios, Hyundai Venue, Mahindra बोलेरो आणि Kia Seltos या टॉप-15 मधील इतर कार आहेत.