Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी, कशी ते जाणून घ्या
Asia cup 2023 : आशिया कप स्पर्धेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 3-0 ने धुवा उडवत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये आशिया कप स्पर्धेत चुरस पाहायला मिळणार आहे.
1 / 6
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यातून टीम इंडिया आशिया कप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत नंबर 1 पोझिशनसाठीही चुरस असणार आहे.
2 / 6
वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तान 23 सामन्यात 2725 पॉईँट आणि 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 23 सामन्यात 2714 पॉईंट आणि 118 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टीम इंडिया 36 सामन्यात 4081 पॉईंट आणि 113 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.
3 / 6
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 गुणांचा फरक आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली तर नंबर वन गाठण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियाला चांगला जोर लावून जेतेपदावर नाव कोरणं गरजेचं आहे.
4 / 6
भारताने पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकले तर क्रमवारीत महत्त्वपूर्ण फरक दिसून येईल.भारताने आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली तर अव्वल स्थान निश्चित असणार आहे.
5 / 6
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली तर टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर स्थानी असेल. कारण टीम इंडिया टी20 आणि टेस्टमध्ये नंबर 1 आहे.
6 / 6
टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये 59 सामन्यात 15,589 पॉईंटसह 264 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्येही 29 सामन्यात 3434 पॉईंटसह 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.