IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी 2 सप्टेंबरला आमनेसामने, दोघांपैकी कुणाची बाजू मजबूत?

| Updated on: Aug 27, 2023 | 7:14 PM

india vs pakistan asia cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

1 / 6
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या वनडे सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. तर सर्वात जास्त विकेट्सचा रेकॉर्डही टीम इंडियाच्या अनिल कुंबळे याच्या नावावर आहे.

2 / 6
टीम इडिया विरुद्ध पाकिस्तान 2 सप्टेंबरला आशिया कपमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. क्रिकेट विश्वाला या सामन्याची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी पाहता पाकिस्तान वरचढ आहे.

3 / 6
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 132 वनडे मॅच खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 132 पैकी 55 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 73 सामन्यात पराभव झाला आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अखेरची वनडे ही 2019 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हा टीम इंडियाने 89 धावांनी विजय मिळवला होता.

4 / 6
टीम इंडियाने  पाकिस्तान विरुद्धच्या गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.  टीम इंडियाने पाकिस्तानला सप्टेंबर 2018 मध्ये 2 सामन्यात पराभूत केलं होतं. टीम इंडियाने 8 आणि 9 विकेट्सने सामने जिंकले होते. तर तिसरा सामन्यात टीम इंडियाने 89 धावांनी जिकंलेला.

5 / 6
टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने 69 सामन्यांमध्ये 2 हजार 526 धावा केल्या आहेत. सचिनने या दरम्यान 5 शतक आणि 16 अर्धशतकं ठोकली आहेत.

6 / 6
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या वनडे मॅचमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड हा अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. कुंबळेने 34 सामन्यात 54 विकेट्स घेतल्या आहेत.