Hardik Pandya | चूकलास मित्रा! तिलक वर्मा सोबत केलेल्या त्या कृतीमुळे हार्दिक पंड्या ट्रोल
Hardik Pandya Trolled | कॅप्टन हार्दिक पंड्या याने टीम इंडियाला तिसऱ्या टी 20 सामन्यात सिक्स मारुन विजय मिळवून दिला. मात्र हार्दिकवर नेटकरी चांगलेच बरसले आहेत.
1 / 5
टीम इंडियाने विंडिजवर 3 टी 20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने विनिंग शॉट मारुन टीम इंडियला जिंकवलं. हार्दिकने विराटच्या रेकॉर्डची बरोबरी केली. मात्र हार्दिकने तिलक वर्मा याच्यासोबत जे केलं त्यामुळे तो ट्रोल होतोय.
2 / 5
पंड्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात सिक्स ठोकून विजय मिळवून दिला. हार्दिकने टी 20 मध्ये चौथ्यांदा अशी कामगिरी केलीय.
3 / 5
हार्दिक यासह चौथ्यांदा सिक्स मारून विजय मिळवून देणारा विराट कोहली याच्यानंतर दुसरा भारतीय ठरला.
4 / 5
हार्दिकने सिक्स ठोकत विराटच्या विक्रमाची बरोबरी केली. मात्र हार्दिकच्या या सिक्समुळे तिलक वर्मा याला अर्धशतक झळकावता आलं नाही. तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला.
5 / 5
तिलक वर्मा टी 20 क्रिकेटमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खाली बॅटिंग करताना 49 धावांवर नाबाद राहणारा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी 2106 मध्ये सुरेश रैना हा देखील 49 धावांवर नाबाद परतला होता.