बाबर आझमने श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीगच्या दहाव्या सामन्यात वेगवान शतक झळकावून टी20 क्रिकेटमध्ये एक खास विक्रम नोंदवला आहे.
गॅले टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात कोलंबो स्ट्रायकर्सकडून डावाची सुरुवात करणाऱ्या बाबर आझमने अवघ्या 57 चेंडूत शतक झळकावले. या शतकासह टी20 क्रिकेटमध्येदहा शतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. गेलने एकूण 455 टी-20 डावामध्ये 22 शतके झळकावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.
बाबर आझमने 254 टी20 डावामध्ये दहा शतके झळकावली आहेत. गेलनंतर टी20 क्रिकेटमध्ये दहा शतके झळकावणारा दुसरा फलंदाज होण्याचा विक्रम केला आहे.
या यादीत विराट कोहली तिसऱ्या असून एकूण 357 टी20 डाव खेळले असून आठ शतके झळकावली आहेत. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. एकूण 355 टी20 डावांमध्ये फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने आठ शतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच 376 टी20 डावात एकूण आठ शतके झळकावून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.