Cricket Australia : वनडे वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी
Glenn Maxwell : वनडे वर्ल्डकप स्पर्धा जवळ येत आहे तसं ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याला दुखापत झाल्याने दक्षिण अफ्रिका सीरिजमधून बाहेर गेला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याबाबत शंका आहे.
1 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. पण या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्या डाव्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. ट्रेनिंग दरम्यान त्याला ही गंभीर दुखापत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
2 / 7
ग्लेन मॅक्सवेल गेल्या वर्षापासून पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पण त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 संघात निवड करण्यात आली होती.
3 / 7
दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेलचं भारताविरुद्ध सीरिज खेळणंही कठीण आहे. ही सीरिज वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने त्याच्या जागी मॅथ्यू वेड याला संधी देणअयात आली आहे.
4 / 7
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 वर्ल्डकप दरम्यान मॅक्सवेलला फ्रीक इंजरी झाली होती. त्यामुळे वर्ल्डकपनंतर अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघासाठी एकही सामनाा खेळला नव्हता.
5 / 7
ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे संघात खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन आणि डेव्हिड वॉर्नर यांनाही दक्षिण आफ्रिकन संघातून वगळण्यात आलं आहे.
6 / 7
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ सदस्य टोनी डोडेमाइड यांनी सांगितलं की, आम्ही मॅक्सवेलच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. वनडे वर्ल्डकपपूर्वी भारतात होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
7 / 7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन टर्नर, मॅथ्यू वेड , अॅडम झाम्पा.