आशिया कप स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत आहे. पहिल्याच सामन्यनात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहे. तर टीम इंडियाचा पहिलाच सामना हा 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे.
आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हा पाकिस्तान आणि श्रीलंका इथे पार पडणार आहेत. तर टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत पार पडतील. तसेच सेमी फायनल आणि फायनल सामन्याचं आयोजन श्रीलंकेतच करण्यात आले आहेत.
आशिया कपमधील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सामने हे मुल्तान, लाहोर, कँडी आणि कोलंबो शहरात पार पडणार आहेत.
आशिया कप यंदा वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास सामने हे 50 ओव्हरचे असणा आहेत. 2022 मध्ये टी 20 वर्ल्ड कप असल्याने आशिया कप टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात आला होता.
आशिया कप 2023 स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही सामने पाहता येतील.
तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार एपच्या मदतीने मोबाई आणि लॅपटॉपवर आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने पाहता येतील.