Marathi News Photo gallery South african cricketer pumelela matshikwe gets 6 years jail sentence for match fixing in ram slam t20 2015 case
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूची बेईमानी, मॅच फिक्सिंगसाठी 6 वर्षाची शिक्षा, 10 वर्षांसाठी बंदी
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात टी 20 मालिका खेळण्यासाठी आला आहे. त्यांनी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतील एका क्रिकेटपटूला 6 वर्षांची शिक्षा झाली आहे.
1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात टी 20 मालिका खेळण्यासाठी आला आहे. त्यांनी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतील एका क्रिकेटपटूला 6 वर्षांची शिक्षा झाली आहे. दक्षिण आफ्रिकन संघ हायवेल्ड लायन्सचा माजी वेगवान गोलंदाज पुमेलेला मतशिक्केला न्यायालयाने 6 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
2 / 5
या वेगवान गोलंदाजाने 2015 मध्ये रॅम स्लॅम टी 20 चॅलेंज स्पर्धेत मॅच फिक्सिंग केली होती. त्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुमेलेला मतशिक्केने 2015 साली झालेल्या रॅम स्लॅम टी 20 चॅलेंज स्पर्धेत मॅच फिक्स करण्यासाठी पैसे घेतले होते. तो भ्रष्टाचार विरोधी पथकाला हा पैसा कुठून आला? तो स्त्रोत सांगू शकला नव्हता.
3 / 5
त्यानंतर 2016 मध्ये त्याच्यावर 10 वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली. पुमेलेलावर 10 वर्षाची बंदी आहे. तो 2026 पर्यंत कुठल्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही.
4 / 5
पुमेलेला मतशिक्के दक्षिण आफ्रिकेत 77 फर्स्ट क्लास मॅच, 57 लिस्ट ए आणि 24 टी 20 सामने खेळला आहे.
5 / 5
पुमेलेलाशिवाय दक्षिण आफ्रिकेचे आणखी पाच क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरले आहेत. यात गुलाम बोदी, लोनाबो सोत्सोबे, थामी सोलोकिले, जीन सायम्स, एथी मभालाती यांचा समावेश आहे. गुलाम बोदीला 2019 साली पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.